Esha Gupta Bold Photo: इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यानंतर ईशा गुप्ता चे सर्व पोस्ट झाले डिलीट, अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले बोल्ड फोटो
तसेच अनेक जण तिला तिचे पोस्ट डिलिट होण्यामागचे कारण देखील विचारत आहे. तिच्या या हॉट फोटोला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिचे चित्रपट म्हणावे तितके चालले नाही. मात्र आपल्या हॉटनेसमुळे आणि सेक्सी फोटोज मुळे ती सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असणारी ईशा गुप्ताचे इन्स्टाग्राम अकाउंट काही दिवासांपूर्वी हॅक झाले होते. ईशाचे इन्स्टावर 5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र त्याच दरम्यान तिच्या इन्स्टावरील सर्व पोस्ट डिलीट झाले होते. याबाबतची माहिती स्वत: ईशाने सोशल मिडियावरुन दिली होती. अशातच आता या अभिनेत्रीने आपला एक हॉट फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ईशाने केवळ निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातले आहे. यात ती आपले Clevage दाखवत आपल्या चाहत्यांची झोप उडवली आहे. या फोटोला चाहते पसंत करत असून कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. तसेच अनेक जण तिला तिचे पोस्ट डिलिट होण्यामागचे कारण देखील विचारत आहे. तिच्या या हॉट फोटोला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
याआधी ईशाने अशी माहिती दिली होती की, मागील 3 दिवसांत तिचे अकाउंट अनेकदा हॅक झाले. मात्र आता सर्व नियंत्रणात आहे. इतकच नाही तर ती आपले डिलिट झालेले पोस्ट पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.