पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकसाठी निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय, चित्रपट प्रदर्शित करण्यावर स्थगिती
चित्रपट पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बायोपिकवरुन निर्मात्यांसाठी चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन अधिकाधिक संकट वाढत चालले आहे.
चित्रपट 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) यांच्या बायोपिकवरुन निर्मात्यांसाठी चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन अधिकाधिक संकट वाढत चालले आहे. तर सुप्रीम कोर्टाने या चित्रपटासाठी हिरवा कंदील दाखला खरा पण निवडणुक आयोगाने या चित्रपटासंबंधित मोठा निर्णय दिला असून प्रदर्शित करण्यात येणाऱ्या तारखेवर स्थगिती दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याच नेत्याच्या संदर्भातील चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही.
तसेच लाल बहादुर शास्री यांच्या मृत्यू घटनेवर आधारित चित्रपट द ताशकंद फाईल्स चित्रपटावर ही संकट ओढवणार असल्याची शक्यता आहे. मंगळवारी सीबीएफसी कडून एक यू प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले होते. तसेच चित्रपट निर्माते उमंग कुमार बी यांनी असे म्हटले आहे की, याबद्दल कल्पना होतीच की शेवटी वादाच्या भोवऱ्यात हा सिनेमा अडकणार आहे आणि तेच झाले आहे.(हेही वाचा-PM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव)
यापूर्वी सुद्धा विरोधकांकडून पीएम मोदी चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रदर्शित करु नये अशी मागणी केली होती. तसेच काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुक आयोगकडे चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखेवरुन धाव घेत याचिकासुद्धा दाखल केली होती.