Drugs Case: सुशांत सिंह राजपूत याचा मित्र ऋषिकेश पवार याने पळ काढल्यानंतर NCB कडून शोध सुरु, अभिनेत्याला ड्रग्ज दिल्याचा ठपका
त्यानुसार सुशांत याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार हा फरार असून त्याचा तपास NCB ने सुरु केला आहे.
Drugs Case: बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीने (NCB) नवे कॅम्पेन लॉन्च केले आहे. त्यानुसार सुशांत याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार हा फरार असून त्याचा तपास NCB ने सुरु केला आहे. ऋषिकेश पवार याच्यावर सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा ऋषिकेश याची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच गेल्या वेळी सुद्धा ड्रग्ज प्रकरणी तपास केला जात होता तेव्हा एका ड्रग्ज सप्लायरने ऋषिकेश याचे नाव घेतले होते. या व्यतिरिक्त दीपेश सावंत याने सुद्धा आपल्या जबाबात त्याचे नाव घेतले होते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पवार याच्याकडून यापूर्वी मुंबईतील एक कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अंटकपूर्व जामिनासाठी अपील केले होते. यानंतर बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने पुन्हा दिवाणी न्यायालयात पाठवले. गेल्या गुरुवारी ऋषिकेश पवार याची याचिका फेटाळून लावल्यानंतर एनसीबीचे पथक चेंबूर मधील घरी दाखल झाली. परंतु त्याने तेथून पळ काढला होता.(सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर मागच्या 100 दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार? शिवसेनेचा सवाल)
Tweet:
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मते, ऋषिकेश याचा शोध घेतला जात आहे. तो सुशांत सिंहच्या ड्रीप प्रोजेक्टमध्ये असिस्टंट डायरेक्टर होता. समोर आलेल्या पुराव्यांनुसार स्पष्ट झाले आहे की, ऋषिकेश हा सुशांत याला ड्रग्ज सप्लाय करत होता. एनसीबीने ऋषिकेशच्या घरातून लॅपटॉप जप्त केला आहे. ज्यामध्ये काही डेटा सुद्धा मिळाला आहे. एनसीबीने त्याला चौकशीसाठी बोलावले पण तो आला नाही. त्याचा अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावली गेली त्यानंतरच त्याला ताब्यात घेण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षात जून महिन्यात सुशांत याने राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी सीबीआय तपास करत होती. मात्र या प्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर आता एनसीबीकडून अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत एनसीबीने काही लोकांना सुद्धा अटक केली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड मधील काही कलाकारांची सुद्धा चौकशी केली गेली आहे.