‘All We Imagine As Light’: 'प्रसिद्धीसाठी कपडे काढण्याची गरज नाही', न्यूड सीन ऑनलाइन लीक प्रकरणावर दिव्या प्रभा हिचे सडेतोड उत्तर

Divya Prabha Nude Scene: चित्रपटातील न्यूड सीन्स ऑनलाईन लिक झाल्यानंतर अभिनेत्री दिव्या प्रभा हिने प्रतिक्रिया दिली आहे. घडला प्रकार निंदनीय आहे, प्रतिद्धीसाठी कपडे उतरविण्याची गरज नाही, असे तिने म्हटले आहे. सध्या ती 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' चित्रपटामुळे चर्चे आहे.

A Still From All We Imagine as Light Trailer (Photo Credits: YouTube)

Malayalam Cinema Controversy: 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' (All We Imagine as Light) या चित्रपटातील नग्न दृश्य (Divya Prabha Nude Scene) ऑनलाइन लीक झाल्यानंतर मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभा (Divya Prabha) हिने अखेर मौन सोडले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिव्याने दृश्ये लिक झाल्याच्या प्रकाराला "खरोखर दयनीय" असे म्हटले आहे. तिने पुढे असेही म्हटले की, असे काही घडू शकेल किंवा त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येईल, असे काहीसे अपेक्षीत होते. ही दृश्ये कशी लिक झालीयाबाबत आपण अनभिज्ञ आहोत, असे तिने म्हटले आहे. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी ही दृश्ये जाणीवपूर्वक लिक केल्याच्या आरोपाला उत्तर देताना तिने म्हटले आहे की, "प्रसिद्धी मिळवण्यासाठी मला निर्वस्त्र होण्याची गरज नाही''. यासोबतच तिने आपल्यावर झालेले सर्व आरोपही फेटाळून लावले आहेत.

आरोप आणि टीकेवरुन निराशा

पायल कपाडियाच्या (Payal Kapadia Film) कान्स-विजेत्या चित्रपटात अनु या तरुण मल्याळी परिचारिकेची भूमिका साकारणाऱ्या दिव्या प्रभा हिने आरोप आणि होणाऱ्या टीकेबद्दल निराशा व्यक्त केली. दुबईमध्ये दिग्दर्शक थमर के. व्ही. सोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरून बोलताना ती म्हणालीः "आम्ही योर्गोस लँथिमोस सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या धाडसी अभिनयासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या अभिनेत्रींना सन्मानित करतो. तरीही, मल्याळी महिलांनी समान भूमिका साकारल्याबद्दल आम्ही असहिष्णु आहोत असे मानने ही मानसिकता निराशाजनक आहे ". (हेही वाचा, मल्याळम अभिनेत्री Divya Prabha सोबत Air India Flight मध्ये मद्यप्राशन केलेल्या सहप्रवाशाकडून गैर वर्तन ; पोलिस तक्रार दाखल)

अभिनेत्री दिव्या प्रभा हिने पुढे सांगितले की, लोकांच्या एका छोट्या गटाने तिच्या भूमिकेवर टीका केली. पण अनेकांनी तिला पाठिंबा दिला, पाठिंबा देणाऱ्यांचीसंख्या टीका करणाऱ्यांपेक्षा अधिक होती, असेही ती म्हणाली. लीक झालेल्या क्लिप्स सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांना सोडेतोड उत्तर देताना, केवळ 10% लोक अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये गुंतले आहेत असे ती म्हणाली. पुढे ती म्हणाली, मल्याळी हा चित्रपटाला मान्यता देणाऱ्या केंद्रीय मंडळाचा भाग होता. मी विश्वास ठेवणाऱ्या पटकथा निवडते आणि 'ऑल वी इमॅजिन एज लाईट' मधील माझ्या भूमिकेबद्दल मला पूर्ण खात्री होती. माझ्या मागील कामगिरीवरून हे दिसून येते की मला स्वस्त प्रसिद्धीची गरज नाही, असेही तिने ठासून सांगितले.

'ऑल वी इमॅजिन एज लाइट' सिनेमाचा ट्रेलर

पायल कपाडिया दिग्दर्शित हा चित्रपट अधिकृत इंडो-फ्रेंच सह-निर्मिती आहे, ज्यात पेटिट कॅओस (फ्रान्स) चाक अँड चीज आणि अनदर बर्थ यांचा समावेश आहे. कानी कुसरुती, छाया कदम, हृदू हारून आणि दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट बनून इतिहास रचला. सध्या चित्रपटगृहांमध्ये चालणारा हा चित्रपट गुंतागुंतीच्या कथा आणि धाडसी विषयांचा शोध घेतो. वाद असूनही, समीक्षकांनी त्याची कलात्मक दृष्टी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील अभूतपूर्व कामगिरीचे कौतुक केले आहे. द्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now