Disha Patani ने 'मेरे नसीब में' या सुपरहिट गाण्यावर केला अफलातून डान्स, Music Video ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
युट्यूबवर शेअर केलेला हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आपल्या डान्स पार्टनर्ससह या गाण्यावर हिपहॉप स्टाईल करताना दिसत आहे.
बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या चाहत्यांसाठी एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये ती 'मेरे नसीब में' (Mere Nasib Me) या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून युट्यूबही धुमाकूळ घालत आहे. नुकताच युट्यूबवर शेअर केलेला हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आपल्या डान्स पार्टनर्ससह या गाण्यावर हिपहॉप स्टाईल करताना दिसत आहे.
दिशाने आज एव्हरग्रीन गाणे 'मेरे नसीब में' या गाण्यावर एक म्यूजक व्हिडिओ शूट केला आहे. यातील तिची डान्स स्टाईल तिचे चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडिओतील तिच्या डान्स मूव्हस पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.हेदेखील वाचा- अभिनेत्री Disha Patani चा 'HOT' बिकीनी फोटो व्हायरल; दिशाचा असा फोटो पाहुन चाहत्यांचे उडाले होश
या व्हिडिओमध्ये दिशा पटानी सह डिंपल कोटेचा आणि कोरिओग्राफर अकन सेन थिरकताना दिसत आहे. एका इमारतीच्या टेरेसवर हे गाणे शूट करण्यात आले आहेत.
तिचे चाहते देखील तिच्या या डान्स मूव्हसचे कौतुक करत आहे. हा व्हिडिओ लोक प्रचंड पसंत करत असून कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
दिशा पटानीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर, ती लवकरच सलमान खान सोबत 'राधे: योर मोस्ट वॉन्टेट भाई' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान आणि रणदीप हूडा देखील दिसणार आहेत. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यासह दिशा दिग्दर्शित मोहित सूरीसोबत त्याच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटात काम करणार आहे. हे दोघेही वर्ष 2020 मध्ये 'मलंग' चित्रपटात एकत्र दिसले होते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2021 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

