Disha Patani Bikini Pics: दिशा पटानी हिचा बिकिनीमधील फोटो पाहून टायगर श्रॉफ याच्या आईने दिली 'अशी' प्रतिक्रिया

सध्या दिशा पटानी अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.

Disha Patani (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या दिशा पटानी अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, तिने समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशाच्या या हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव केला आहे. मात्र, दिशाचा बिकिनीतील फोटो पाहून टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा पटानीने आपल्या इन्स्टाग्राम फोटो शेअर केला आहे. दिशाने या फोटोमध्ये लाल रंगाजची बिकनी घालून समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. दिशाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनीसुद्धा दिशाच्या फोटोवर कमेंट केली आहे. ‘वाह दिशू’ म्हणत त्यांनी तिच्या फोटोंची स्तुती केली आहे. हे देखील वाचा- DeepVeer 2nd Wedding Anniversary: लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा; शेअर केले रोमँटिक फोटो (See Photos)

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच हे दोघेही बागी 2 या चित्रपटात एकत्र दिसले होते. दिशाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती नुकतीच ‘मलंग’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर ती लवकरच 'राधे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भुमिका सलमान खान साकारणार आहे.