Diljit Dosanjh Removed From Border 2: बॉर्डर 2 मधून दिलजीत दोसांझला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्याने मोजावी लागली मोठी किंमत

काही दिवसांपूर्वीच, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने 'बॉर्डर 2' च्या निर्मात्यांना पत्र लिहून दिलजीत दोसांझला चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

Diljit Dosanjh (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Diljit Dosanjh Removed From Border 2: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम करणे दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) ला चांगलचं महागात पडलं आहे. बॉलिवूड चित्रपट 'बॉर्डर 2' (Border 2) मधून पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला वगळण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने 'बॉर्डर 2' च्या निर्मात्यांना पत्र लिहून दिलजीत दोसांझला चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

बॉर्डर 2 मधून दिलजीत दोसांझला बाहेरचा रस्ता -

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, FWICE ची मागणी लक्षात घेऊन, 'बॉर्डर 2' च्या निर्मात्यांनी दिलजीतला चित्रपटातून काढून टाकले आहे. हा दावा सूत्रांच्या हवाल्याने अहवालात केला जात आहे. जर अहवालावर विश्वास ठेवायचा झाला तर, 'बॉर्डर 2' मधून दिलजीत दोसांझला काढून टाकण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी संयुक्तपणे घेतला आहे. तथापि, 'बॉर्डर 2' च्या निर्मात्यांनी किंवा इतर कलाकारांनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. (हेही वाचा - Drug Case: ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अटकला अटक; 7 जुलैपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी)

दिलजीत दोसांझ ऐवजी 'हा' अभिनेता साकारणार भूमिका -

माध्यमातील वृत्तानुसार, दिलजीत दोसांझऐवजी आता पंजाबी अभिनेता एमी विर्क ही भूमिका साकारण्याच्या अटकळा बांधल्या जात आहेत. चित्रपटाचे निर्माते लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा करतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement