Drug Case: ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अटकला अटक; 7 जुलैपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी श्रीकांतची सुमारे आठ तास चौकशी केली, त्यानंतर अभिनेत्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या घटनेमुळे श्रीकांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Drug Case: ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अटकला अटक; 7 जुलैपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी
South actor Srikanth (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Drug Case: चेन्नई पोलिसांनी सोमवारी तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीकांत (Srikanth) ला अटक (Arrest) केली. श्रीकांतला ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी श्रीकांतची सुमारे आठ तास चौकशी केली, त्यानंतर अभिनेत्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या घटनेमुळे श्रीकांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रक्ताच्या चाचणीत झाला मोठा खुलासा -

किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी श्रीकांतच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर तपासात अभिनेत्याच्या शरीरात अंमली पदार्थांची उपस्थिती असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री श्रीकांतला एग्मोर येथील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आणि रिमांडवर घेण्यात आले. आता या अभिनेत्याला 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा -Mannat Bungalow Inspected by BMC: शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची बीएमसी आणि वन अधिकाऱ्यांकडून पाहणी; नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय)

दरम्यान, माजी अण्णाद्रमुक सदस्याला अटक करण्यात आली तेव्हा श्रीकांत संशयाच्या भोवऱ्यात आला. चौकशीदरम्यान प्रसादने श्रीकांतला ड्रग्ज पुरवल्याची कबुली दिली. श्रीकांतवर अण्णाद्रमुकमधून काढून टाकण्यात आलेल्या प्रसादकडून ड्रग्ज खरेदी आणि सेवन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी श्रीकांतला अटक केली. चौकशीदरम्यान, अटक करण्यात आलेला प्रदीप कुमार अण्णाद्रमुकच्या माजी अधिकारी प्रसादला ड्रग्ज विकत होता हे देखील उघड झाले. तथापी, ही ड्रग्ज बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाकडून खरेदी केली जात असल्याचंही तपासात उघडकीस आलं आहे.

तथापी, अटकेनंतर श्रीकांत किंवा त्याच्या टीमने ड्रग्जशी संबंधित आरोपांवर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. श्रीकांत हा तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने 2002 मध्ये 'रोजा कूटम' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर तो अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये दिसला. श्रीकांतला तमिळ राज्य चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. परंतु, आता त्याचे नाव ड्रग्ज प्रकरणात जोडण्यात आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).