सुशांत सिंह राजपूत शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज होणार प्रदर्शित; चाहत्यांनी ट्विटरवर ट्रेंड केला #DilBecharaDay

या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबड़ा ने आज ट्विटरवर 'दिल बेचारा डे' असे लिहिले आहे. त्यामुळे फॅन्सनेही हाच हॅशटॅग पुढे ट्रेंड केला.

Sushant Singh Rajput's Dil Bechara Title Track (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड हरहुन्नरी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) आज OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे आज सकाळपासून ट्विटरवर #DilBecharaDay ट्रेंड होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुशांत सिंह च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजम हा मुद्दा जोर धरू लागला आणि सुशांतला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी संपूर्ण देशभरातून होऊ लागली आहे.

यामुळे सुशांतच्या या शेवटच्या चित्रपटाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबड़ा ने आज ट्विटरवर 'दिल बेचारा डे' असे लिहिले आहे. त्यामुळे फॅन्सनेही हाच हॅशटॅग पुढे ट्रेंड केला.

पाहा ट्विट:

त्यासोबत सलमान खानच्या फॅन क्लबनेही लोकांना हा चित्रपट पाहण्याचे अपील केले आहे.

हेदेखील वाचा- Dil Bechara Online Premiere: सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' चित्रपटाचा प्रीमियर विनामूल्य पाहता येणार; ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

आज संध्याकाळी 7.30 वाजता डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट नि:शुल्क स्ट्रीम केला जाईल. सुशांतसह या चित्रपटात संजना संघी (Sanjana Sanghi)मुख्य भूमिकेत दिसणार आहे.