Dia Mirza चे होणारा पती Vaibhav Rekhi आणि कुटुंबियांसोबत जोरदार सेलिब्रेशन; पहा Photos

उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी दिया बॉयफ्रेंड वैभव रेखी सोबत विवाहबद्ध होणार आहे.

Dia Mirza and Vaibhav Rekhi (Photo Credits: Instagram)

Dia Mirza and Vaibhav Rekhi Wedding: 'रहना है तेरे दिल में'  फेम अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी दिया बॉयफ्रेंड वैभव रेखी सोबत विवाहबद्ध होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिया आणि वैभव काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. लग्नापूर्वी दोघांनीही आपल्या कुटुंबियांसह जोरदार सेलिब्रेशन केले. याचे काही फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

पूजा डडवाल ने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना तिने लिहिले की, दिया मिर्जा तुझे आमच्या नटखट परिवारात स्वागत आहे. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. सोशल मीडियावर पूजाच्या या फोटोंजना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. तसंच या फोटोजची सध्या जोरदार चर्चा आहे.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Dadlani (@poojadadlani02)

2019 मध्ये दियाने पहिले पती साहिल संघा यांच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर दोन वर्षांनी ती पुन्हा एकदा आयुष्यात प्रेम अनुभवते आहे. उद्या दोघेही विवाहबद्ध होणार असून या सोहळ्यास केवळ कुटुंबिय आणि मित्रमंडळी उपस्थित असतील. (Dia Mirza चे दुसरे लग्न; बिजनेसमॅन Vaibhav Rekhi सोबत 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात)

दरम्यान, वेभव रेखी मुंबईतील बिजनेसमॅन आणि फायनेंशियल इन्वेस्टर असतील. ते पाली हिल येथे राहतात. वैभव ने यापूर्वी फिटनेस कोच सुनैना रेखी सोबत विवाह केला होता. त्यांना एक मुलगी देखील आहे.