Sidhu Moose Wala Murder: मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याची मागणी; भाजप नेत्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

पंजाब सरकारने (Punjab Government) कोणतेही वैध कारण न देता 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Sidhu Moose Wala, Supreme Court (PC - FB and PTI)

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसवाला हत्या (Sidhu Moose Wala Murder) प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते जगजित सिंग मिल्खा यांनी ही याचिका दाखल केली आहे. पंजाब सरकारने (Punjab Government) कोणतेही वैध कारण न देता 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे. आता ती पूर्ववत करण्यात आली आहे. त्याचदरम्यान हे हत्याकांड घडले. यामध्ये कॅनडाच्या क्राइम सिंडिकेटचेही नाव पुढे येत आहे. ही परिस्थिती पाहता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणारी याचिका भाजप नेत्याने न्यायालयात दाखल केली आहे.

भाजपच्या तिकिटावर सरदुलगड मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणूक लढवलेल्या जगजित सिंग यांच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, पंजाबमध्ये अलीकडच्या काळात असुरक्षिततेचे वातावरण वाढले आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा. (हेही वाचा - Arya Samaj Marriage Certificate: आर्य समाजाला विवाह प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

याचिकेत पंजाब सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांनी शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा तर काढली. त्यानंतर 28 मे रोजी त्यांची सुरक्षा काढण्यात आली आणि 29 मे रोजी मुसेवाला यांची हत्या झाली.

कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldy Brar) याने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणाशी लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) सह अनेक कुख्यात गुन्हेगारांची नावे जोडली जात आहेत. पंजाब पोलिसांना हा तपास निष्पक्षपणे पार पाडता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, असंही याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.