बॉलिवूड कलाकारांच्या संदर्भात Defamatory Content दाखवू नये, दिल्ली हायकोर्टाचे News Channels ला आदेश
दिल्ली हायकोर्टाने दिग्गज चित्रपट निर्मात्यांच्या याचिकेवर सुनावणी करत टीव्ही चॅनल्ससाठी एक नोटीस जाहीर केली आहे. कोर्टाने टेलिव्हिजन वरील चॅनल Republic आणि TimesNow यांना निर्देश दिले आहेत की, बॉलिवूडला आरोपांच्या कोर्टात उभे करणारे बेजबाबदार, अपमानकारक किंवा मानहानि करणाऱ्या पद्धतीची कोणतीही माहिती किंवा कंन्टेट पासून दूर ठेवावे. बॉलिवूड सेलिब्रेटीसच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे मीडिया ट्रायल करु नये. बॉलिवूड मधील 24 निर्मात्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये काही युनियन आणि प्रोडक्शन हाउसचा समावेश आहे.
चित्रपट निर्मात्यांनी एका महिन्यापूर्वी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये असे म्हटले होते की, मीडियाकडून बेजबाबदार पद्धतीने रिपोर्टिंग केले जात आहे. कोर्टाने निरेदेश दिले होते की, चॅनल किंवा सोशल मीडियात कोणत्याही प्रकारे मानहानिचा दावा करणारा कंन्टेंट दाखवू नये. याचिकाकर्त्यांचे वकील राजीव नैयर यांनी म्हटले होते की, युट्युब, सोशल मीडिया आणि ट्विटरवर बॉलिवूड संदर्भातील अपमानकारक गोष्टी तातडीने हटवाव्यात. चॅनलवर जे काही दाखवले जाते त्यामधून नागरिकांचा दृष्टीकोन निर्माण होतो.(KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना चाहत्याकडून मिळाली अनपेक्षित भेट, पाहून बिग बी ही झाले भावूक)
शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान आणि अन्य काही जणांची त्यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या न्यूज चॅनलच्या विरोधात खटला दाखल केला. तर आता कोर्टाने टाइम्स नाउ यांच्या वकिलांना या प्रकरणी क्लाइंट सोबत गंभीर स्वरुपात विचार करावा असे म्हटले आहे. तसेच प्रोग्राम कोड सुद्धा फॉलो करावा असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे टाइम्स नाउसह अन्य चॅनल्सने यापुढे कोणत्याही प्रकारे अपमानकारक व्हिडिओ चालवू नये असा इशारा दिला आहेय