Deepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार
14 आणि 15 नोव्हेंबर असे दोन दिवस रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणचा विवाहसोहळा दोन पद्धतीने पार पडणार आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आज इटलीमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर असे दोन दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरचे चाहते फारच उत्सुक आहेत. मोजक्याच लोकांमध्ये विवाहसोहळा पार पडणार असला तरीही त्याचे कोणतेच फोटो सोशल मीडियावर दिसणार नाहीत.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो एका मॅग्झीनला खास विकले जाणार आहेत. त्यामधून मिळणारी रक्कम दीपिका आणि रणवीर Live Laugh Love या दीपिकाने सुरू केलेल्या चॅरिटीसाठी वापरले जाणार आहेत. 28 नोव्हेंबरला मुंबईत होणार्या रिसेप्शनमध्येही गिफ्ट न आणता उपस्थितांनी चॅरिटीसाठी डोनेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इटलीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक
इटलीमध्ये लेक कोमो परिसरात दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. काल दीपिका आनि रणवीरचा कोकणी पद्धतीने साखरपुडा पार पडला. आज लग्न सोहळा होणार आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियामध्ये लीक होऊ नये म्हणून कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. लग्नाच्या वेळेस ड्रोन कॅमेर्यावर बंदी आहे. लग्नात सहभागी होणार्या उपस्थितांच्या मोबाईलवरही स्टिकर्स लावण्यात आले आहे. यामुळे कोणालाहि फोटो काढता येणार नाहीत.
खास रिस्ट ब्रँड आणि विशेष कोड असलेल्या ई पासच्या मदतीने पाहुण्यांना लग्नात प्रवेश देण्यात येणार आहे.