'मी त्याला Cheat करताना रंगेहाथ पकडलं' दीपिका पादुकोण हिचा पूर्व रिलेशनशिप बाबत मोठा खुलासा

दीपिका पादुकोण कडून प्रेमाच्या बाबत निर्णय घेताना अनेक चुका झाल्या आहेत ज्याचा आजही तिला पश्चाताप होती असे तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

Deepika Padukone (Photo Credits: Youtube)

बॉलिवूड मध्ये फिमेल सेलिब्रिटींच्या यादीत कोणाचे नाव मिस परफेक्शनिस्ट म्ह्णून घेतले जात असेल तर ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone). आपल्या, कामाच्या, पेहरावाच्या, बोलण्याच्या, वावरण्याचा गोष्टीत दीपिका भानाने वागत असते. मात्र याच दीपिका कडून प्रेमाच्या बाबत निर्णय घेताना अनेक चुका झाल्या आहेत ज्याचा आजही तिला पश्चाताप होती असे तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केला, माझ्यावर चीट करताना मी त्याला रंगेहाथ पकडले होते त्याला दुसरी संधी सुद्धा दिली कारण मी त्याच्या प्रेमात आंधळी होते, त्याने माझ्याकडे माफीची अक्षरशः भीक मागितली, विनवणी केली होती. म्हणून मी त्याला माफ केलं. मात्र या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मला फार वेळ लागला” असे दीपिकाने आपल्या मुलाखतीत सांगितले.

लग्नापूर्वीच्या अफेअरबद्दल दीपिका या मुलाखतीत बोलत होती. “माझ्यासाठी शारीरिक संबंध म्हणजे केवळ जवळीक नसून त्यात भावनासुद्धा गुंतलेल्या आहेत. मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही किंवा कोणापासून काही लपवले नाही. जर कोणी माझी फसवणूक करत असेल तर मी अशा व्यक्तीसोबत का राहू? त्यापेक्षा मी सिंगलच राहणं पसंत करेन.”असेही तिने यावेळी बोलताना सांगितले. (म्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल)

दरम्यान ,दीपिकाने या बोलण्यात कोणाचेही स्पष्ट नाव घेतलेले नाही मात्र तिच्या बोलण्याचा रोख रणबीर कपूर कडे असावा, असा अंदाज या मुलाखतीवरून अनेकांनी व्यक्त केला. दीपिका आणि रणबीर यांचे ब्रेकअप आणि त्यानंतरही त्यांची एकत्र केलेली कामे यातून त्यांच्या केमेस्ट्री विषयी नेहमीच चर्चा व्हायची. मागील वर्षी तिने आपला लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड रणवीर सिंह सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे लव्हबर्ड्स पहिल्यांदा एकत्र 83 या सिनेमातून एकत्र दिसणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif