Deepika Padukone: भारतात भगव्या बिकनीवरुन ट्रोल झालेली अभिनेत्री दिपिका पदूकोणची फिफा ट्रॉफी लाँच करण्यास निवड का झाली? फिफा ट्रॉफी लाँच करणारी दिपीका पहिली भारतीय महिला
जगभरातून दिपीकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काल संध्याकाळपासून दर पाच मिनिटांनंतर प्रत्येकाच्या कानावर पडणारा शब्द म्हणजे फिफा विश्वकप, मेसी, अर्जेंटीना. पण याच सोबत एक भारतीय नाव मोठं चर्चेत आहे आणि ते म्हणजे अभिनेत्री दिपीका पदूकोण. भारत फुटबॉल विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात तर लांब पण फुटबॉल विश्वचषकात सहभागी देखील नव्हता. तरी भारताचा या फुटबॉल विश्वचषकात चांगलाचं बोलबाला बघायला मिळाला आहे. त्याच दिपीका पदूकोणने या विश्वचषकात आपला सहभाग नोंदवून चार चांद लावले आणि खेळात नसूनही भारताची चर्चा झाली. फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी भारतीय अभिनेत्री दिपीका पदूकोणच्या हस्ते लॉंच करण्यात आली. किंबहून फिफाची ट्रॉफी लॉंच करण्याचा बहूमान मिळणारी दिपीका पहिली भारतीय महिला ठरली. जगभरातून दिपीकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतासाठी हा क्षण खास होता. कारण ज्या फुटबॉल वर्ल्डकपची जगात क्रेझ आहे, ज्यात भारतीय फुटबॉल टीमचा नामशेषही नाही पण त्या विश्वषकाची थेट ट्रॉफी लॉंच करण्याचा बहूमान भारतीय लेकीला मिळाल्याने देशासाठी ही मोठी कौतुकाची बाब आहे. मात्र स्वतच्या माय देशी सध्या अभिनेत्री दिपीका पदूकोणला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आगामी चित्रपट पठाणच्या गाण्यात दिपीकाने भगव्या रंगाची बिकनी गालून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याचा दिपीकावर आरोप होत आहे. तरी यावर अभिनेत्री दिपीका पदूकोणने कुठलीगही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. तरी दिपीकाने फिफा ट्रॉफी लॉंच करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (हे ही वाचा:- FIFA World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या विजयानंतर Ranveer ने Deepika ला मारली मिठी (Watch Video))
अभिनेत्री दिपीका पदूकोण ही भारतीय अभिनेत्री असली तरी जागतिक स्तरावर दिपीकाची विशेष ओळख आहे. दिपीका विविध आंतरराष्ट्रीय ब्राण्ड्सचा ग्लोबल चेहरा आहे. टाईम मॅगझिनचं कव्हर पेज असो कान्स फेस्टीव्ह वा हॉलिवूड स्टार व्हेन डिझेल बरोरची भुमिका जागतिक दर्जावर चर्चेत आहे. तसेच फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी लक्झरी ब्रँड लुई विटॉनने डिझाईन केली असुन अभिनेत्री दिपीका पदूकोण या ब्राण्डची ब्राण्ड अम्बेसेडर आहे. त्यामुळे दिपीकाला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. कुठल्याही माध्यमातून का असेना पण भारताच्या लेकीने जागतिक स्तरावर भारताचं नाव काढल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.