अभिनेत्री झायरा वासीम हिची बॉलिवूडमधून एक्झिट

आमिर खान (Amir Khan) याच्या दंगल चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री झायरा वासीम (Zaira Wasim) हिने बॉलिवूडमधून एक्झिट घेतली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

झायरा वसीम (फोटो सौजन्य-ट्वीटर)

आमिर खान (Amir Khan) याच्या दंगल चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री  झायरा वासीम (Zaira Wasim) हिने बॉलिवूडमधून एक्झिट घेतली असल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणाची तिने इन्स्टाग्रामच्या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये झायरा हिने 5 वर्ष काम करत होती. तर अवघ्या 18 व्या वर्षात झायरा हिने बॉलिवूडच्या करिअरला अलविदा केले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर अल्लहाने दाखवलेल्या रस्त्यापासून भटकली होती. त्याचसोबत पाच वर्षांपूर्वी घेतलेला निर्णयाने आयुष्य बददले खरे. मात्र एवढ्या लहान वयात मी संघर्ष करु शकत नसल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच कुराणचा सुद्धा उल्लेख झायरा हिने पोस्टमध्ये केला आहे. मात्र कोणाच्या दबावाखाली तिने ही पोस्ट लिहिली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.