Shah Rukh Khan वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड

शाहरुखकडे महागडे घड्याळ आणि कव्हर होते. ज्यासाठी त्याने कस्टम ड्युटी भरली नव्हती. चौकशी केल्यानंतर त्याला सुमारे सात लाख रुपयांचा दंड भरावा लागला.

Shah Rukh Khan (Photo Credits: Facebook SRK FanPage)

Customs Officials Action on Shah Rukh Khan: शुक्रवारी रात्री उशिरा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याच्या टीमला कस्टम अधिकाऱ्यांनी (Customs Officials) मुंबई विमानतळावर थांबवले. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. एका कार्यक्रमानिमित्त तो यूएईला गेला होता. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत बाहेर आला. शाहरुखकडे महागडे घड्याळ आणि कव्हर होते. ज्यासाठी त्याने कस्टम ड्युटी भरली नव्हती. चौकशी केल्यानंतर त्याला सुमारे सात लाख रुपयांचा दंड भरावा लागला. शाहरुख त्याच्या टीमसह दुबईमध्ये एका खासगी चार्टरद्वारे एका पुस्तक लाँच कार्यक्रमात पोहोचला होता. काल रात्री 12.30 वाजता ते मुंबईला परतले.

शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये मौल्यवान घड्याळांची कव्हर सापडली. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी सर्वांची तपासणी केली. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टारकडे सुमारे 18 लाख रुपयांच्या महागड्या घड्याळांचे कव्हर होते. ज्यासाठी त्याला 6.83 लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागली. (हेही वाचा - Bipasha Basu Blessed with Baby Girl: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचं आगमन)

सुमारे तासभर चौकशीची संपूर्ण प्रक्रिया चालली. यानंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांचे अंगरक्षक रवी आणि इतर सदस्यांना थांबवण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बिल शाहरुखच्या बॉडीगार्डच्या नावाने बनवण्यात आले आहे. मात्र, हे पैसे शाहरुखच्या क्रेडिट कार्डवरून दिल्याचे सूत्रांकडून समजते.

याप्रकरणी शाहरुखच्या टीमकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख पुढील वर्षी 3 चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'पठाण' वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार आहे. त्यानंतर 'जवान' आणि 'डंकी' चित्रपट रिलीज होतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now