कोरोना विरुद्धच्या लढ्यात आर्थिक मदतीसह शाहरुख खान याचा शाब्दिक आधार; मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देण्यासाठी चक्क मराठी भाषेतून ट्विट

त्यासाठी केलेल्या ट्विटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहरुख आणि गौरीचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आभारप्रदर्शनावर शाहरुख खान याने चक्क मराठीत उत्तर दिले आहे.

शाहरुख खान (Photo credit: Twitter @ShahRukhKhanFC)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लढाईत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असाताना बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) देखील पुढे सरसावला आहे. देशावर आलेल्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी त्याने आर्थिक मदतीसह शाब्दिक आधारही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी केलेल्या ट्विटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शाहरुख आणि गौरी यांचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आभार प्रदर्शनावर शाहरुख खान याने चक्क मराठीत उत्तर दिले आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शाहरुख म्हणाला की, "या लढाईत आपण सर्व एकत्र आहोत. कारण थेंबा थेंबानेच तळं साचतं. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर मदतीचा महासागर तयार होईल." तसंच त्याने मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. आपण सर्व एक कुटुंब आहोत. एकमेकांना निरोगी ठेवण्यासाठी एकमेकांसोबत असणे गरजेचे आहे. धन्यवाद, असेही शाहरुखने पुढे म्हटले आहे.

यापूर्वी शाहरुख खान याने मुख्यमंत्र्यांसाठी एक ट्विट केले होते. त्यात त्याने लिहिले होते की, "कोरोनाच्या या संकटात तुमच्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येकाला तुमच्यासाठी न थकता काम करु दे. जे तुमच्या संपर्कात नाहीत तसंच तुम्ही त्यांना ओळखत नाही त्या सर्वांना तुमच्यासाठी काम करु दे. म्हणजे त्यांना ते एकटे आहेत असे वाटणार नाही. एकमेकांची काळजी घेण्यासाठी आपल्या परिने शक्य ते प्रयत्न आपण करुया. भारत आणि सर्व भारतीय आपण सर्व एकच परिवार आहोत." शाहरुखच्या या ट्विटबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानले. त्यावर शाहरुखने मराठी भाषेतून ट्विट करत चाहत्यांसह सर्वांना सुखद धक्का दिला आहे. (कोरोना व्हायरसच्या लढाईत शाहरुख खानही पुढे सरसावला; PM, CM Fund ला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण, अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार)

शाहरुख खान ट्विट:

कोरोना व्हायरसच्या लढ्यात शाहरुख खान याने सढळ हस्ते मदत केली आहे. प्रधानमंत्री केअर फंड, महाराष्ट्र केअर फंड, बंगाल केअर फंड यांना त्यांनी आर्थिक मदत केली असून 50,000 लोकांची रोज जेवणाची व्यवस्था सर्व नियंत्रणात येईपर्यंत शाहरुख खानकडून करण्यात आली आहे. तसंच दिल्लीत अडकलेल्या 3,000 मजुरांची व्यवस्थाही त्याने केली आहे.