'एक दिवस हे क्षण आठवण बनून राहतील' असं म्हणत कोरोना व्हायरस संकटाच्या गंभीर काळात शाहरुख खान याचा चाहत्यांना खास संदेश
कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात होणारा त्रास, कुंचबणा लक्षात घेत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याने ट्विट करत चाहत्यांसह सर्वांचाच धीर दिला आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सध्या देशभरात थैमान सुरु आहे. कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव टाळण्यासाठी सर्वांनाच घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा काळ कठीण आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली भयंकर परिस्थिती आणि घरात बसून होणारी कुचंबणा यामुळे मन निराश होते, अस्वस्थ वाटते. या परीक्षेच्या काळात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याने ट्विट करत चाहत्यांसह सर्वांचाच धीर दिला आहे. शाहरुख खान याने ट्विटरवर आपला फोटो शेअर करत छानसा मेसेज लिहिला आहे.
शाहरुखने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आता आपल्याकडे वेळ आहे आपल्या लोकांसोबत राहण्याचा आणि आपले प्रियजनही आपल्या सोबत आहेत, हे क्षण एक दिवस आठवण बनून जातील, असा मला विश्वास आहे. सुरक्षित रहा, स्वस्थ रहा आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करा." या पोस्टसोबत शाहरुखने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबद्दल शाहरुखने लिहिले की, "या सेल्फीचा आणि मेसेज तसा काही संबंध नाही. पण मला असं वाटलं यात मी चांगला दिसतोय म्हणून पोस्ट केला." (कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार)
शाहरुख खान पोस्ट:
कोरोना व्हायरसच्या या संकटात शाहरुख आणि गौरी यांनी मिळून आर्थिक मदत केली आहे. प्रधानमंत्री केअर फंड, महाराष्ट्र केअर फंड, बंगाल केअर फंडात रक्कम दान करत मजुरांच्या व्यवस्थेचा खर्चही शाहरुख उचलणार आहे. तसंच आपल्या ऑफिसची जागा त्यांनी विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला दिली आहे.