Besharam Rang: आता बेशरम रंग गाण्याविरुध्द थेट पोलिसात तक्रार, तक्रारदाराकडून एफआयार नोंदवण्याची मागणी
तक्रारदाराने पठाण चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shah Rukh Khan) बहुचर्चित सिनेमा पठाणं पहिलं गाणं बेशरम रंग प्रदर्शित झालं आहे. यातं दिपीकाने (Deepika Padukone) परिधान केलेल्या वस्त्रावरुन गाण्यास सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. काही हिंदू नेत्यांसह भाजप महाराष्ट्राचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam), मध्य प्रदेशाचे (Madhya Pradesh) गृहमंत्री यांनी तर आपापल्या राज्यात हा सिनेमा बॅन करण्याची मागणी केली आहे. पण आतापर्यत जे काही होत हा सगळा वाद सोशल मिडीयावर होता. आता मात्र बेशरम रंग या गाण्याचा वाद थेट पोलिसांत येवून ठेपला आहे. तरी याबाबत आता पोलिस काय अक्शन घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं हे. हल्ली बॉलिवूडची गाणे, सिनिमे, कपडे, अभिनेता-अभिनेत्रीच्या कुठल्या बाबींवरुन वाद उफाळून येईल ह्याचा काहीही नेम नाही.
पठाण (Pathan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang Song) या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) भगव्या पोशाखावरून साकीनाका पोलिसात (Sakinaka Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने पठाण चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे. साकीनाका पोलिसांनी मात्र या विरोधात अद्याप तरी कुठलीही एफआयआर नोंदवलेली नाही. तरी पुढे या तक्रारी संदर्भात पोलिस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:- Haddi: कपाळावर टिकली, ओठांवर लाली असलेला नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' चित्रपटातील नवा लूक पाहून चाहते घायाळ; पहा फोटोज)
पठाण सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असुन फक्त एका गाण्यावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेत्रीच्या कपड्याचा रंग खरचं कुठल्या धर्माच्या भावना दुखवू शकतो का ही खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरी पठाणचं हे गाणं कितीही ट्रोल होत असलं तरी ह्या गाण्यास चाहत्यांचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे. काहीचं तासात या गाण्याने युट्युबवरील कित्येक गाण्याचे रेकॉर्डस मोडले आहेत.