IPL Auction 2025 Live

Haniya Aslam Passes Away: कोक स्टुडिओ-फेम पाकिस्तानी गायिका हानिया अस्लमचे निधन; वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हानिया अस्लमने 2007 मध्ये बंगशसोबत 'जेब-हानिया' नावाचा बँड तयार करून तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी चाहत्यांना अनेक हिट गाणी दिली. जेबने इंस्टाग्रामवर हानियाला श्रद्धांजली वाहून खंत व्यक्त केली.

Haniya Aslam (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Haniya Aslam Passes Away: प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका हानिया अस्लम (Haniya Aslam) यांचे रविवारी निधन झाले. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हानिया अस्लमचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्या 39 वर्षांच्या होत्या. कोक स्टुडिओतील (Coke Studio) 'लैली जान', 'बीबी सनम', 'पमोना' आणि 'चुप' या हिट गाण्यांसाठी हानिया अस्लम ओळखल्या जातात. त्यांचा चुलत भाऊ आणि सहकारी झेब बंगश यांनी सोशल मीडियावर हानियाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बंगश यांनी त्यांच्या दिवंगत चुलत बहिणीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून दिवंगत गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहे.

हानियाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर गायिकेच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. हानिया अस्लमने 2007 मध्ये बंगशसोबत 'जेब-हानिया' नावाचा बँड तयार करून तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी चाहत्यांना अनेक हिट गाणी दिली. जेबने इंस्टाग्रामवर हानियाला श्रद्धांजली वाहून खंत व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahwash Rehman (@mahwashr)

हानियाने आलिया भट्ट स्टारर हायवे मधील 'सुहा साहा' हे गाणं गायलं होतं. तिने मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटासाठीही काम केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीवर, अनेक भारतीय सेलिब्रिटींनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शोक व्यक्त केला. भारतीय संगीत कलाकार अनिरुद्ध वर्माने लिहिले, 'हे ऐकून मला खूप वाईट वाटले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांचे संगीत सदैव स्मरणात राहील.'

रूप मगन आणि कुर्रम हुसैन या भारतीय-पाकिस्तानी जोडीने त्यांच्या हानिया अस्लमच्या छायाचित्रासह एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'आज आपल्या संगीत उद्योगाने एक महान कलाकार आणि आत्मा गमावला आहे. हानियाला कधीही विसरता येणार नाही.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanand Kirkire (@swanandkirkire)

भारतीय गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे यांनी लिहिले, 'माझ्या प्रिय हनिया अस्लम @citrushaniya आता राहिल्या नाहीत. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आम्ही @dewarists 2 'कहो क्या ख्याल है' वर काम केले. तेव्हा आमच्यात एक वेगळंच नात तयार झालं होतं.' हानियाच्या मृत्यूची बातमीने भारत आणि पाकिस्तानमधील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.