BMC: अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय? घ्या जाणून
मात्र, अरबाज आणि सोहेलला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ता डीएसपी चैतन्य एस यांनी दिली आहे.
अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan), सोहेल खानसह (Sohail Khan) त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध (Nirvaan Khan) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमसीच्या (BMC) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. नव्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन आणि यूएईवरून आलेल्या प्रवाशांता 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र, हे तिघेही यूएईवरून परतल्यानंतर ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचे सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते.
25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी त्यांचे बुकींग ताज हॉटेलमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला महापालिकेने आढावा घेतला. त्यावेळी हे तिघेही हॉटेलमध्ये गेलेच नाहीत. तसेच ते घरी निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआय वृत्त संस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Malaika Arora Hot Photo: स्विमिंग पूल मध्ये योगा करताना दिसली मलायका अरोरा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
एएनआयचे ट्विट-
याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, अरबाज आणि सोहेलला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ता डीएसपी चैतन्य एस यांनी दिली आहे. तसेच या तिघांना भायखाळाच्या रिचर्डसन अँड क्रूडास येथील क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. तिथे त्यांना 9 जानेवारीपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे समजत आहे.