Coronavirus: मुंबई पोलिसांच्या भावनिक व्हिडिओ ला पाठिंबा दर्शवत अजय देवगण आणि आलिया भट यांनी आपल्या फिल्मी अंदाजात दिला जनतेला मोलाचा संदेश
यात बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgan) याने फिल्मी अंदाजात मुंबई पोलिसांचे कौतुक करत आपल्या सिंघम आणि खाकी सिनेमाचा उल्लेख करत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
COVID-19 चा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. असे असताना देखील लोक सर्रासपणे घराबाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अशा काही बेजबाबदार लोकांमुळे पोलिसांना रात्रंदिवस ऑनड्युटी काम करावे लागत आहे. यात मुंबईचीही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे या लोकांना आपल्या परिस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक सुंदर आणि भावनिक संदेश देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून अनेक कलाकारांनी या पोस्टला रिट्विट करत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
यात बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgan) याने फिल्मी अंदाजात मुंबई पोलिसांचे कौतुक करत आपल्या सिंघम आणि खाकी सिनेमाचा उल्लेख करत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
मुंबई पोलिसांचा व्हिडिओ:
हेदेखील वाचा- Coronavirus: मुंबई पोलिसांनी 'आम्ही घरी असतो तर काय केले असते' हे सांगत शेअर केला भावनिक व्हिडिओ, Must Watch
तर आलिया भट (Alia Bhatt) हिने लोकांना सांगितलेला महत्त्वाच्या संदेशाबद्दल तिचे आभार मानत मुंबई पोलिसांनी नागरिकांनी तिच्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
यांच्या सोबत, सई ताम्हणकर, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी, रिचा चढ्ढा, अभिषेक बच्चन यांनीही या व्हिडिओचे कौतुक करुन मुंबई पोलिसांना पाठिंबा दर्शविला आहे.