Amitabh Bachchan Health Update: बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया- Reports
27 मार्चला हा ब्लॉग समोर आल्यानंतर सर्वांची एकच धांदल उडाली. त्यांच्यावर मोतीबिंदूचा शस्त्रक्रिया झाल्याचे समोर येत आहे
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रकृती बिघडल्याची बातमी वा-यासारखी पसरली आणि चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांना नेमके काय झाले, त्यांची कसली सर्जरी होतेय, त्यांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया (Cataract Surgery) झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या 24 तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो आणि ते घरी जाऊ शकतात असेही सांगण्यात येत आहे.
बिग बींनी स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यावर सर्जरी होणार असल्याची माहिती दिली होती. 27 मार्चला हा ब्लॉग समोर आल्यानंतर सर्वांची एकच धांदल उडाली. त्यांच्यावर मोतीबिंदूचा शस्त्रक्रिया झाल्याचे समोर येत आहे.हेदेखील वाचा- Amitabh Bachchan Health: बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, कोणत्याही क्षणी होऊ शकते सर्जरी
तसेच त्यांनी ट्विटच्या द्वारे देखील आपल्यावर सर्जरी होण्याचे संकेत दिले होते. "काही गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. काही कापल्यानंतर सुधार होईल. जीवनकाळ उद्या आहे की नाही, हे उद्याचा कळेल" असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार काल (28 फेब्रुवारी) ला त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाल्याचे रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.
सध्या त्यांच्या अनेक चित्रपटांचे शुटिंग सुरु आहे. कौन बनेगा करोडपती 12 हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर अमिताभ ब्रह्मस्त्र आणि चेहरे या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते.
अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'झुंड' चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपटाची रिलीज तारीखही जाहीर केली होती. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते. यात बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.