IPL Auction 2025 Live

वर्षाखेरीस हे '5' धमाकेदार बॉलिवूड सिनेमे मनोरंजनासाठी सज्ज!

त्यामुळे सुट्ट्यांमध्ये किंवा विकेंडला तुम्ही या सिनेमांचा आनंद लुटू शकता.

डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणारे सिनेमे (File Photos)

List of Bollywood Movies Releasing in December 2018: वर्षाचा शेवटचा महिना येतोय. त्यामुळे ख्रिसमस, सुट्ट्या आणि न्यू ईअरचा आनंद यांची सांगड असेलच. पण त्याचबरोबर बॉलिवूडचे काही खास सिनेमे देखील तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये किंवा विकेंडला तुम्ही या सिनेमांचा आनंद लुटू शकता. सिनेमाप्रेमींसाठी या महिन्यात अनेक सिनेमांची मेजवानी असणार आहे. तर पाहुया डिसेंबर महिन्यात कोणते नवे सिनेमे तुमच्या भेटीला येणार आहेत... वर्षाखेरीस रसिकांसाठी या '4' मराठी सिनेमांची मेजवानी!

सिम्बा (Simba)

'सिम्बा' हा सिनेमा म्हणजे रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. या सिनेमात बिनधास्त, बेधडक, निडर पोलिस इन्सफेक्टरच्या रुपात रणवीर सिंग दिसणार आहे. रोहित शेट्टी सिनेमा म्हणजे अॅक्शन पॅक असणार यात काही वाद नाही. 28 डिसेंबरला तुम्ही या सिनेमाचा आनंद लुटू शकता.

झिरो (Zero)

किंग खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'झिरो' देखील याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत कतरिना कैफ, अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. यात बाऊआ सिंग ही आगळीवेगळी भूमिका शाहरुख खान साकारत आहे. 21 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

केदारनाथ (Kedarnath)

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या 'केदारनाथ' सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर पाहुन सिनेमाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. 7 डिसेंबरला या सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर (Merey Pyare Prime Minister)

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' हा सिनेमा 14 डिसेंबरला प्रेक्षागृहात धडकणार आहे. 'रंग दे बसंती,' 'भाग मिल्खा भाग,' 'दिल्ली 6' यांसारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' हा स्वच्छतेवर भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The Accidental Prime Minister

'The Accidental Prime Minister' हा सिनेमा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जीवनपट उलघडणार आहे. यात अभिनेते अनुपम खेर 'मनमोहन सिंग' यांची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.