सुप्रसिद्ध गायिका सुनिधि चौहान चे दुसरे लग्नही आले संपुष्टात, 8 वर्षाचे नाते तुटण्यामागे 'ही' गोष्ट ठरली कारणीभूत
तिथून परत आल्यानंतर यांच्यात भांडणे होण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे यांच्या नात्यात फूट पडली
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधि चौहान (Sunidhi Chauhan) हिच्या वैवाहिक आयुष्य सध्या एका नाजूक वळणावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे सांगितले जात आहे की, सुनिधि चौहान आपला पति हितेश सोनिक याच्यापासून वेगळी झाली आहे. 8 वर्षांच्या या गोड नात्याचा अचानक शेवट करण्याचा निर्णय या जोडप्याने का घेतला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सांगितले जात आहे गेल्या काही काळापासून सुनिधि आपल्या नव-यापासून वेगळेच राहत होती. याबाबत त्यांनी स्वत: मिडियाला कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्पॉटबॉयच्या रिपोर्ट नुसार, काही दिवसांपूर्वी सुनिधि आपल्या पती हितेश आणि त्याच्या मित्रांसोबत गोव्याला गेली होती. तिथून परत आल्यानंतर यांच्यात भांडणे होण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे यांच्या नात्यात फूट पडली. प्रेम आणि नात्यामधील 'या' काही गोष्टी ज्या फक्त ब्रेकअप नंतर समजतात
Rohit Shetty ने पोलिसांसाठी केले ८ होटल्स बुक ; मुंबई पोलिसांनी मानले रोहित शेट्टीचे आभार - Watch Video
एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये हितेश आणि सुनिधि लग्नगाठीत अडकले आहे. त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा आहे. सुनिधि सोशल मिडियावर आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करते. सुनिधिचे हे दुसरे लग्न आहे. सुनिधि जेव्हा 19 वर्षांची होती तेव्हा 2002 मध्ये तिने कोरिओग्राफर बॉबी खान याच्याशी लग्न केले होते. मात्र वर्षभरात हे लग्न संपुष्टात आले.