Bollywood Drugs Controversy: रवि किशन यांनी लोकसभेत उठवलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्द्यावर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं
रवि किशन यांचे वक्तव्य हे खूप लज्जास्पद असून ते स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे म्हणजे 'ज्या थाळीत खाणे त्याच थाळीत छेद केल्यासारखे आहे असं त्या म्हणाल्या.'
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत असून रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) चौकशी दरम्यान ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. तिच्यामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज तस्करी हा प्रकरण देखील समोर आले. यामुळे यावर नजर टाकत भाजपचे नेते तसेच अभिनेते रवि किशन (Ravi Kishan) लोकसभेत बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर बोलल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेत्री तसेच सपा नेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) चांगल्याच भडकल्या. रवि किशन यांचे वक्तव्य हे खूप लज्जास्पद असून ते स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे म्हणजे 'ज्या थाळीत खाणे त्याच थाळीत छेद केल्यासारखे आहे असं त्या म्हणाल्या.'
जया बच्चन राज्यसभेत याबाबत बोलताना म्हणाल्या की, "मला खूपच शरम वाटत आहे की, काल आपल्या एका नेत्याने लोकसभेत फिल्म इंडस्ट्री विरोधात वक्तव्य केले जे स्वत: या इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. अशा पद्धतीचे बोलणे त्यांना शोभा देत नाही. हे चुकीचे आहे. फिल्म इंडस्ट्रीला सरकारचे समर्थन हवे." थोडक्यात जया बच्चन रवि किशन यांना स्वार्थी आणि खाल्ल्या मिठाला न जागणारा व्यक्ती असं म्हणाल्याचे दिसून येत आहे. सारा अली खान, रकुल प्रित सिंग यांची ड्रग्ज प्रकरणी नावे समोर आल्याची NCB ची माहिती, रिया हिने केला होता नावांचा खुलासा
दरम्यान रवि किशन सोमवारी लोकसभेत असे म्हणाले होते की, "पाकिस्तान आणि चीनद्वारा पंजाब आणि नेपाळ येथून भारतात येणारे ड्रग्ज सप्लाय थांबवला पाहिजे. कारण हे आपली युवा पीढी बरबाद करत आहे." तसेच ज्या प्रकारे NCB च्या टीमने या इंडस्ट्रीतील अनेक लोकांवर ड्रग्जचे सेवन आणि तस्करी करण्याचे आरोप केले आहेत त्यानुसार केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करत आरोपींना शिक्षा दिली पाहिजे. असेही ते पुढे म्हणाले.
रवि किशन या वक्तव्यावर समाजवादी नेत्या जया बच्चन खूपच नाराज दिसल्या आणि त्यांनी आपली नाराजी राज्यसभेत बोलताना व्यक्त केली. दरम्यान ड्रग्ज प्रकऱणी आतापर्यंत रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीसह अन्य लोकांना NCB ने अटक केली आहे.