बॉलिवूड डिझायनर Swapnil Shinde आता Transwoman Saisha; अभिनेत्री सई ताम्हणकर सह बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवत केलं कौतुक
सायशा म्हणजेच स्वप्नील शिंदेने यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोन, कतरिना कैफ, श्रुती हसन, अनुष्का शर्मा, करिना कपूर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत काम करत त्यांचे स्टायलिंगदेखील केले आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde) याने फॅशन जगताला नव्या वर्षामध्ये एक नवा खुलासा केला आहे. नुकतचं सोशल मीडीयावर त्याने आता तो स्वप्नील नसून सायशा (Saisha)असल्याचं म्हटलं आहे. स्वप्नील आता ट्रान्सवूमन (Transwoman) असल्याचं त्याने शेअर केले आहे. नव्या अंदाजातील फोटो आणि एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. सध्या स्वप्नील ते सायशाच्या प्रवासाची चर्चा सोशल मीडीयामध्ये आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर, आदिती राव हैदरी, श्रुती हसन, सनी लिओन यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
स्वप्नीलने मनातील भावना मोकळ्या करत, ' लहानपणी मला इतर मुलांकडून मिळालेली वागणूक खूपच त्रासदायक होती. सुरूवातीला माझं पुरूषांकडे असणारं आकर्षक पाहून मी 'गे' आहे असा मला वाटत होतं. पण मी स्वतःला जसं 6 वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वीकारलं तसं मी आता हे सांगू इच्छितो की मी गे नाही तर मी ट्रान्सवूमन आहे.'
स्वप्नील शिंदे पोस्ट
नक्की वाचा: Shocking! लिंग पुरुषाचे असूनही गर्भाशय असल्याने अल्पवयीन मुलगा गरोदर.
सायशाची झलक
सायशा म्हणजेच स्वप्नील शिंदेने यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोन, कतरिना कैफ, श्रुती हसन, अनुष्का शर्मा, करिना कपूर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत काम करत त्यांचे स्टायलिंगदेखील केले आहे.