Raj Kundra Post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्राने (Raj Kundra) सोशल मीडियावर वेगळे होण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, 'आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात आम्हाला तुमचा वेळ द्या,' असं आवाहनही राज कुंद्रा यांनी केलं आहे. राज कुंद्राच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. काही लोक विचारत आहेत की तू खरोखरच तुझी पत्नी शिल्पा शेट्टीपासून वेगळे झाला आहेस का? महत्त्वाची बाब म्हणजे राज कुंद्राने आपल्या पोस्टमध्ये पत्नी शिल्पा शेट्टीपासून वेगळे होत असल्याचे लिहिलेले नाही.
राज कुंद्राने या पोस्टचा स्क्रीनशॉटही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राज कुंद्राच्या स्टोरीवर यूजर्संनी विचारले की वेगळे म्हणजे काय, घटस्फोट. दुसर्याने लिहिले, धक्कादायक बातमी. आणखी एका युजरने लिहिले की, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्टंट आहे. (हेही वाचा - Gold iphone चोरणाऱ्या व्यक्तीने Urvashi Rautela ला केला मेसेज; फोन परत करण्याच्या बदल्यात घातली 'ही' अट)
मात्र, शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर असे काहीही शेअर केलेले नाही. राज कुंद्राच्या UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राज कुंद्रा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट राज कुंद्रा एका पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात गेला त्यावेळेवर आधारित आहे.
राज कुंद्राला अटक करून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. जुलै 2021 मध्ये पोर्नोग्राफी फिल्म प्रकरणात त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते. हा अतिशय वादग्रस्त विषय होता. सप्टेंबर महिन्यात राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आले. या संपूर्ण प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचे राज कुंद्रा म्हणाले. राज कुंद्रा यांनी UT69 च्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
We have separated and kindly request you to give us time during this difficult period 🙏💔
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा विवाह नोव्हेंबर 2009 मध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. दोघेही प्रत्येक कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देताना दिसतात. आता ही पोस्ट पाहून चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. तर काही लोक याला प्रमोशनल म्हणत आहेत.