पूजा हेगड़े (Photo Credits: Instagram)

Pooja Hegde Purchases a Luxury Flat in Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ने तिच एक महत्त्वपूर्ण स्वप्न पूर्ण केलं आहे. तिने मुंबईच्या वांद्रे भागात 3 बीएचके सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे. मिस इंडिया युनिव्हर्स ते बॉलिवूड जगात आपले स्थान प्रस्थापित करण्याच्या प्रवासासह अगदी लहान वयात या अभिनेत्रीने बरीच कामगिरी केली आहेत. पूजाने आपल्या कमाईने खरेदी केलेले हे पहिले घर आहे. ज्यात ती आपले स्वतंत्र जीवन व्यतीत करत आहे. पूजाचं हे घर तिच्या पालकाच्या घराच्या अगदी जवळ आहे.

अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हे घर आपल्या मुलासारखे मानते. कारण. पूजाने घराच्या प्रत्येक भागावर बारीक काम केले आहे. यात डिझाइन करण्यापासून ते निवडक साहित्य या सर्व गोष्टींचा समावेश आहे. शूटिंगच्या कामात सातत्याने व्यस्त असतानादेखील पूजाने मुंबईत आल्यानंतर नवीन घराच्या कामाकडे बारकाईने लक्ष दिलं. (वाचा - Prithviraj Film Release on Diwali: अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' चित्रपट दिवाळीच्या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज; 'या' चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही झाली कन्फर्म)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

पूजा यापूर्वी कधीही तिच्या आईवडिलांपासून वेगळी राहिलेली नाही. मात्र आता पूजासाठी स्वतंत्र घरात राहणं एक नवीन सुरुवात करण्यापेक्षा कमी नाही. पूजा लवकरचं रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि सलमान खानसमवेत 'कभी ईद कभी दिवाली' आणि दक्षिण सुपरस्टार प्रभाससमवेत 'राधेश्याम' चित्रपटामध्ये दिसणार आहे.