बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सोनू सूद ला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली मागणी
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच कलाकारांनी गरजूसाठी आणि कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. कोरोना विरोधातील लढाईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सोनू सूदने (Sonu Sood) सर्वाधिक मदत केली. त्यामुळे या दोघांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Awards) देण्यात यावा, अशी मागणी सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून जोर धरत आहे.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच कलाकारांनी गरजूसाठी आणि कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. कोरोना विरोधातील लढाईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सोनू सूदने (Sonu Sood) सर्वाधिक मदत केली. त्यामुळे या दोघांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Awards) देण्यात यावा, अशी मागणी सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून जोर धरत आहे.
सध्या ट्विटरवर अक्षय कुमार आणि सोनू सूद यांचा फोटो शेअर करून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ट्विटर युर्झसने ही मागणी उचलून धरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात मागणी केली आहे. (हेही वाचा - अमिताभ बच्चन यांनी कुटुंबातील 3 पिढ्यांचा फोटो शेअर करत ताज्या केल्या जून्या आठवणी (See Pic))
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना पीएम केअर फंडसाठी आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर लगेचचं अक्षय कुमारने कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडसाठी 25 कोटींची मदत केली होती. याशिवाय अक्षय कुमारने मुंबई महानगरपालिकेला मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केल्याने देशातील विविध राज्यात अनेक मजूर अडकले होते. या मजूरांच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला होता. सोनू सूदने देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष बस तसेच विमानांची व्यवस्था केली. त्याच्या या सामाजिक कार्यामुळे नेटीझन्स भारावून गेले होते.