Vidyut Jammwal Posts Nude Pics: बॉलिवुड अभिनेता विद्युत जामवालने शेअर केले न्यूड फोटोज; नेटीझन्सनी व्यक्त केला संताप, म्हणाले, 'उर्फीला मागे टाकलं'
Vidyut Jammwal (PC - Instagram)

Vidyut Jammwal Posts Nude Pics: विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) असा एक बॉलिवूड सेलिब्रिटी आहे, जो दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी विद्युत धोकादायक स्टंट करताना दिसतो तर कधी तो त्याच्या चाहत्यांसोबत प्रेमाने फोटो क्लिक करतो. दरम्यान, विद्युत जामवालचे काही ताजे फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या लेटेस्ट फोटोंमध्ये विद्युत जामवाल कपड्यांशिवाय (Vidyut Jammwal Nude Photos) दिसत आहे. वूम्पलाच्या अकाऊंटवरून विद्युतचे हे फोटो समोर आले आहेत, ज्यावर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

वूम्पलाच्या या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्युत जंगलासारख्या ठिकाणी बसला आहे. फोटोत एक सुंदर धबधबाही दिसत आहे. विद्युतचे एकापाठोपाठ एक तीन फोटो समोर आले आहेत. या छायाचित्रात विद्युत जंगलाच्या मध्यभागी आग लावून अन्न शिजवताना दिसत आहे. एका चित्रात विद्युत कपड्यांशिवाय पाण्यात उभा आहे. विद्युतचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. फोटोंवर काही लोकांच्या मजेदार कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा - IB 71 Trailer Released: विद्युत जामवालच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Spy Agent बनून लावणार जीवाची बाजी)

येथे पहा फोटोज - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'याने रणवीर सिंग आणि उर्फीला मागे सोडले आहे'. तर दुसर्‍या युजरने लिहिले आहे, 'काय काय पाहावे लागत आहे'. आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'भाऊ, खरचं हिम्मत पाहिजे'. तर दुसऱ्याने 'खरा आदिम माणूस' असे लिहिले आहे.