लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमण याने पत्नी अंकिता कंवर सह शेअर केला खास व्हिडिओ (Watch Video)
लग्नाच्या पहिल्या वाढदिवासानिमित्त दोघांनीही खास व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा गेल्या वर्षी गर्लफ्रेंड अंकिता कंवर (Ankita Konwar) सह विवाहबंधनात अडकला. अंकिता आणि मिलिंद मध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे त्यांचे नाते आणि लग्न चर्चेचा विषय ठरला होता. मात्र लोकांच्या टीकेला दाद न देता आपल्या प्रेमावर ठाम राहत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ अत्यंत खास असून त्यात आपल्याला लग्नाच्या विधींसह त्यांचा डान्सही पाहायला मिळतो. या व्हिडिओच्या बँकग्राऊंडला 'गुरु' सिनेमातील 'बिन तेरे क्या जीना' हे गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मिलिंद सोमण याने लिहिले की, "मागील वर्ष अत्यंत सुंदर होते मात्र जितकी ती सुंदर आहेस तितके नाही. तु नेहमी खूश रहा अंकिता."
मिलिंद सोमण पोस्ट:
तर हाच व्हिडिओ शेअर करत अंकिताने लिहिले की, "आनंदाने भरलले एक वर्ष सरले. एक अशी साथ ज्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले. तुझी साथ माझे जग सुंदर बनवते. प्रत्येक दिवस मला छान वाटतो. तु असल्याने खूप आनंद आहे." ('त्याच्यासोबत किस करताना मी अधिक खोल जाते' मिलिंद सोमण यांची पत्नी Ankita Konwar हिची प्रतिक्रिया)
दोघांनीही अत्यंत भावूक, रोमांटिक पोस्ट करत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस खास केला आहे.
मिलिंद सोमण 53 वर्षांचा असून अंकिता केवळ 27 वर्षांची आहे. दोघांमध्ये तब्बल 26 वर्षांचे अंतर आहे. मात्र प्रेमाला कसलेच बंधन नसते, हे या दोघांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. मिलिंद-अंकिता मधील केमिस्ट्री सोशल मीडियावर फोटोज, व्हिडिओजच्या माध्यमातून अनेकदा दिसून येते.
पहा फोटोज:
22 एप्रिल 2018 रोजी मिलिंद-अंकिता अलिबाग येथे विवाहबद्ध झाले. तर 11 जुलै 2018 मध्ये त्यांनी स्पेनमध्ये पुन्हा लग्न केले.