Nishad Yusuf Passes Away: बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाचे संपादक निशाद युसूफ यांचे 43 व्या वर्षी निधन; कोचीतील घरात आढळले मृतावस्थेत

43 वर्षीय निशाद युसूफ बुधवारी पहाटे 2 वाजता कोचीच्या पानमपिल्ली नगर येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी अद्याप मृत्यूचे कारण सांगितले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Nishad Yusuf Passes Away: बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाचे संपादक निशाद युसूफ यांचे 43 व्या वर्षी निधन; कोचीतील घरात आढळले मृतावस्थेत
Nishad Yusuf with Bobby Deol (फोटो सौजन्य -X/@edits_manoj)

Nishad Yusuf Passes Away: मल्याळमचे लोकप्रिय संपादक निशाद युसूफ (Nishad Yusuf) कोची येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉबी देओल (Bobby Deol) च्या 'कंगुवा' (Kanguva) चित्रपटाचे संपादक निशाद युसूफ यांनी केलं होतं. 43 वर्षीय निशाद युसूफ बुधवारी पहाटे 2 वाजता कोचीच्या पानमपिल्ली नगर येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी अद्याप मृत्यूचे कारण सांगितले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

केरळ फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनच्या डायरेक्टर असोसिएशनने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. यासंदर्भातील पोस्ट शेअर करताना FEFKA ने म्हटलं आहे की, 'बदलत्या मल्याळम सिनेमाचे समकालीन भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट संपादक निशाद युसूफ यांचे निधन. FEFKA डायरेक्टर्स असोसिएशनकडून त्यांच्याप्रती शोक.' (हेही वाचा -Salman Khan Death Threat: '2 कोटी द्या, नाहीतर मारून टाकू'; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी)

प्रादेशिक प्रसारमाध्यमांनी त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे वृत्त दिले असले तरी पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केरळ पोलीस मृत्यूचा तपास करत आहेत. निशाद युसूफ हे मल्याळम आणि तमिळ चित्रपटातील लोकप्रिय चित्रपट संपादक होते. थल्लुमाला, आंदा, वन, सौदी वेलाक्का आणि एडिओस अमिगोस यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. (हेही वाचा - Neena Kulkarni Death Rumours: अभिनेत्री निना कुळकर्णी यांच्या निधनाच्या चर्चा केवळ अफवा, बातम्याही निराधार)

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉबी देओल अभिनीत कांगुवा चित्रपटाचे त्यांनी संपादन केले होते. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. निशाद यांना 2022 मध्ये थल्लुमालावरील कामासाठी सर्वोत्कृष्ट संपादकाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2024 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).