बीजेपी नेते Ram Kadam यांचे उद्योगपती Raj Kundra वर गंभीर आरोप; Online Game द्वारे केली 3000 कोटींची फसवणूक

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी, अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात (Pornography Case) अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत

Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी, अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात (Pornography Case) अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राम कदम यांनी कुंद्रावर गेमिंगमधील जुगाराचा आरोप केला आहे. ते म्हणाले की राज कुंद्रा हा जीओडी (GOD- Game of Dots) नावाचा एक ऑनलाईन गेम चालवत असे आणि त्यामधील फसवणूकीतून पैसे कमवत असे. या खेळाच्या प्रमोशनसाठी त्याने शिल्पाचे फोटो वापरले होते. कदम पुढे म्हणाले की, राज कुंद्राने अनेक लोकांकडून खंडणीही घेतली आहे.

राम कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जीओडी खेळाच्या नावाखाली राजने लोकांकडून 30-30 लाख रुपये घेतले आणि ते परत केले नाहीत. लोक जेव्हा राज कुंद्राकडे पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना बाऊन्सर्सद्वारे मारहाण केली. एवढेच नाही तर पीडितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली. या व्यवसायात कुंद्राने केवळ पत्नी शिल्पा शेट्टीचे नावच वापरले नाही तर, तिचे फोटो व्यवसायाशी संबंधित पेपरमध्ये छापले जात होते. म्हणजेच कुंद्राच्या या व्यवसायात शिल्पा शेट्टी देखील भागीदार आहेत.

ते पुढे म्हणाले, हे सर्व वियान इंडस्ट्रीजच्या नावावर केले गेले आहे. दुर्दैवाने पोलिसांनीही कधी यामध्ये लक्ष घातले नाही. कदम यांनी सांगितले की, राजच्या कंपनीतने सुमारे 3000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. राम कदम यांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने आपला कायदेशीर ऑनलाइन गेम असल्याचे सांगून त्याचे प्रमोशन केले. विआन कंपनीच्या लेटर हेडवर शिल्पा शेट्टीचा फोटो लावून या खेळाचे मार्केटिंग केले. लोकांना सांगण्यात आले की हा खेळ सरकारमान्य आहे. या गेमद्वारे लोकांना बक्षिसाचे लालच दाखवून त्यांची फसवणूक केली. (हेही वाचा: Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Shilpa Shetty ने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला मानहानीचा दावा; म्हणाली- 'माझी प्रतिमा खराब केली')

तीन दिवसांत आरोपींविरोधात कठोर कारवाई न केल्यास ते मुंबई पोलिस आयुक्त आणि गृह मंत्रालयाकडे संपर्क साधतील, असे राम कदम म्हणाले. दरम्यान, सध्या पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात अश्लील चित्रपटाद्वारे हॉटशॉट्सच्या माध्यमातून कुंद्राने 1.17 कोटी रुपयांची कमाई केली असा आरोप त्याच्यावर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif