बिहारच्या विद्यार्थ्याने अॅडमीट कार्डवर वडीलांच्या नावाजागी लिहिले Emraan Hashmi; अभिनेत्याने 'असे' दिले उत्तर

बिहार मधील एका विद्यार्थ्याने आपल्या परीक्षेच्या अॅडमिट कार्डवर वडीलांचे नाव इमरान हाशमी तर आईचे नाव सनी लिओनी असे लिहिले होते. या अॅडमिट कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Emraan Hashmi (Photo Credit: Instagram)

आज बिहारमधून एक आगळीवेगळी बातमी समोर आली. बिहार (BIhar) मधील एका विद्यार्थ्याने आपल्या परीक्षेच्या अॅडमिट कार्डवर (Admit Card) वडीलांचे नाव इमरान हाशमी (Emraan Hashmi) तर आईचे नाव सनी लिओनी (Sunny Leone) असे लिहिले होते. या अॅडमिट कार्डचा (Admit Card) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे अॅडमिट कार्ड कुंदन कुमार (Kundan Kumar) नामक विद्यार्थ्याचे असून तो बिहार मधील धनराज महतो पदवी महाविद्यालयातील (Dhanraj Mahto Degree College) विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याने अॅडमिट कार्डमध्ये वडीलांच्या नावापुढे Emran Hasmi असे लिहिले होते. तर आईच्या नावापुढे Sunny Leone लिहिले होते. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने स्वत:च्या पत्त्याऐवजी बिहार मधील प्रसिद्ध रेड लाईट एरिया 'चर्तुभूज स्थाना'(Chaturbhuj Stha) चे नाव लिहिले होते.

इमरान हाशमीने या घटनेसंबंधी एका आर्टिकलवर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. 'मी शपथ घेऊन सांगतो, तो माझा नाही,' असे ट्विट इमरानने केले आहे. इमरानच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Emraan Hashmi Tweet:

हा विद्यार्थी बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून बिहारमधील भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांना या घटनेबाबत कळवण्यात आले आहे. आम्ही यासंदर्भात चौकशी करणार आहोत. संबंधित घटनेसाठी विद्यार्थी स्वत: जबाबदार असून चौकशीनंतर त्याच्यावरील कारवाईचे स्वरुप ठरवण्यात येईल, असे युनिव्हर्सिटीच्या रजिस्टार रामकृष्ण ठाकूर यांनी सांगितले आहे. (Harami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे)

2019 मध्ये आलेल्या 'Why Cheat India' या सिनेमामधून इमरान हाशमी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता 3 फेब्रुवारी 2021 मध्ये इमरान हाशमीचा नवा सिनेमा 'Sub First Class Hai' रिलीज होणार आहे. यासोबतच 'मुंबई सागा', 'चेहेरे', 'फादर्स डे' आणि 'इझरा' यांसारख्या सिनेमांमधून इमरान हाशमी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.