Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येची धक्कादायक बातमी ऐकून बिहारमधील चाहत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - रिपोर्ट
सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर या चाहत्याला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हा चाहता बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील चंडी ठाणे क्षेत्रातील लोदीपुर गावातील रहिवाशी होता. मिडिया रिपोर्टनुसार, मृत चाहता 'सुशांतचा मृत्यू होऊ शकत नाही,' असं म्हणत होता.
Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या एका चाहत्याने (Fans) गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर या चाहत्याला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हा चाहता बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील चंडी ठाणे क्षेत्रातील लोदीपुर गावातील रहिवाशी होता. मिडिया रिपोर्टनुसार, मृत चाहता 'सुशांतचा मृत्यू होऊ शकत नाही,' असं म्हणत होता.
प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुशांत सिंह राजपूतचा एमएस धोनी 'द अनटोल्ड स्टोरी' (MS Dhoni 'The Untold Story') हा चित्रपट पाहिला होता. मंगळवारी सकाळी तो आपल्या घरातील एका खोलीमध्ये गेला आणि तेथे दरवाजा बंद करून दाव्याच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळानंतर त्यात्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला. परंतु, खोलीमधून कोणताही आवाज येत नसल्याने त्याच्या घरच्यांनी दरवाजा तोडला. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Demise: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांची बॉलीवूडवर सडकून टीका; समोर आले भयानक सत्य, जाणून घ्या कोण काय म्हणाले)
दरम्यान, दरवाजा उघडल्यानंतर सुशांतचा चाहता फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. हा सर्व प्रकार पाहून त्यांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताचं चंडी ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलिस अधिकारी रितु राज कुमार यांनी सांगितले की, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. हा विद्यार्थी सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता.