Sana Makbul Suffering Liver Cirrhosis: बिग बॉस विजेती सना मकबूल गंभीर आजाराने ग्रस्त; 30 व्या वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट
सना मकबूल या आजाराशी झुंज देत आहे. त्याच वेळी, ती आनंदाचे क्षणही पूर्णतः जगत आहे. सनाने आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. तिने तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
Sana Makbul Suffering Liver Cirrhosis: सना मकबूल (Sana Makbul) ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधून तिचा एक फोटो शेअर केला. यामुळे चाहत्यांना कल्पना आली की, सनाची प्रकृती बरी नाही. आता सना मकबूलने तिच्या आजाराबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल तपशीलवार सांगितले आहे.
सना मकबूलला यकृत सिरोसिसचे निदान -
दरम्यान, सना मकबूलने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तिच्या लिव्हर सिरोसिस आजाराबद्दल (Liver Cirrhosis) सांगितले आहे. सना म्हणाली की, 'मी प्रत्यारोपण टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आजकाल मी इम्युनोथेरपी घेत आहे. या उपचारांमुळे मला खूप थकवा जाणवतो. मला फक्त लवकर बरे व्हायचे आहे. हे सोपे काम नाही पण मी हार मानणार नाही.' (हेही वाचा - Avika Gor-Milind Chandwani Engagement: अविका गौर ने केला बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत साखरपुडा)
तथापि, सना मकबूलने भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आजाराचा उल्लेख केला होता. यावेळी तिने सांगितले की, 'मला 2020 मध्ये माझ्या आजाराबद्दल कळले. याची कोणतीही लक्षणे नव्हती पण माझ्या शरीराच्या पेशींनी शरीराच्या अवयवांवर हल्ला करायला सुरुवात केली. माझ्यासोबतची ही समस्या यकृताशी संबंधित आहे. तेव्हापासून मी माझ्या आहारात बरेच बदल केले आहेत, मी शाकाहारी झाले आहे.'
सनाने साजरा केला 30 वा वाढदिवस -
सना मकबूल या आजाराशी झुंज देत आहे. त्याच वेळी, ती आनंदाचे क्षणही पूर्णतः जगत आहे. सनाने आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. तिने तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या फोटोंमध्ये सना खूप आनंदी दिसत आहे.
टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त, सना मकबूल 'बिग बॉस 3' च्या ओटीटी व्हर्जनमध्येही दिसली. ती या रिअॅलिटी शोची विजेती देखील ठरली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सनाने बिग बॉस ओटीटी 3 चा किताब जिंकला आणि 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. याशिवाय, सनाने अनेक साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)