Amitabh Bachchan Health: बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, कोणत्याही क्षणी होऊ शकते सर्जरी
बिग बींची प्रकृती बिघडली असून कदाचित त्यांच्यावर सर्जरी होण्याची शक्यता आहे असे त्यांनी आपल्या ब्लॉगमधून सांगितले आहे.
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभरात लाखोंच्या वर चाहते होते. दमदार आवाज, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चे असे अढळ स्थान बिग बी (Big B) यांनी निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक अपडेट्सच ते आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून देत असतात. दरम्यान त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी त्यांनी शेअर केली आहे. बिग बींची प्रकृती बिघडली असून कदाचित त्यांच्यावर सर्जरी होण्याची शक्यता आहे असे त्यांनी आपल्या ब्लॉगमधून सांगितले आहे.
खुद्द बिग बीने चाहत्यांना बिघडलेल्या तब्येतीची माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेची माहिती देखील त्यांनी ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया, मी लिहू शकत नाही" असा ब्लॉग केला आहे. त्यांच्या या ब्लॉगमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहे.हेदेखील वाचा- Jhund: प्रतीक्षा संपली! नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित
तसेच त्यांनी ट्विटच्या द्वारे देखील आपल्यावर सर्जरी होण्याचे संकेत दिले आहेत. "काही गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. काही कापल्यानंतर सुधार होईल. जीवनकाळ उद्या आहे की नाही, हे उद्याचा कळेल" असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमिताभ बच्चनवर आज शस्त्रक्रिया होणार की नाही ते आज समजेल असे त्यांनी अनपेक्षितपणे सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'झुंड' चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपटाची रिलीज तारीखही जाहीर केली होती. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते. यात बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.