Bhumi Pednekar Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा नंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ती डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि सर्व खबरदारी घेत आहे.

Bhumi Pednekar (PC - Instagram)

Bhumi Pednekar Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. भूमीने सांगितले आहे की, प्रकृती बरी असली तरी, तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. ती डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि सर्व खबरदारी घेत आहे. यासह अभिनेत्रीने तिच्या संपर्कात आलेल्यांना आपली कोविड चाचणी करून घेण्याच आवाहन केलं आहे.

भूमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आज माझ्यात कोविडची सौम्य चिन्हे सापडली आहेत. मला बरे वाटत असून मी स्वत:ला अलग केलं आहे. मी डॉक्टरच्या संपर्कात आहे आणि सर्व खबरदारी घेत आहे. जो कोणी माझ्या संपर्कात आला असेल त्याने आपली चाचणी करुन घ्या. मी स्टीम घेत असून व्हिटॅमिन सी आणि खाण्यापिण्याची काळजी घेत आहे." (वाचा - Akshay Kumar नंतर 'Ram Setu' च्या सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण)

भूमी पेडणेकरने लोकांना कोरोना परिस्थिती हलक्याने घेऊ नये, असं आवाहन केले आहे. भूमीने पोस्टमध्ये लिहिलं की, “कोणत्याही व्यक्तीने ही परिस्थिती हलक्याने घेऊ नये. मी सर्व प्रकारची सावधगिरी बाळगली होती. परंतु, तरीही विषाणूने मला पकडले. मास्क घाला आणि वेळोवेळी आपले हात धुवा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि योग्य गोष्टी करा."

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

दरम्यान, रविवारी अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आलं. कोरोनाची लागण झाल्यावर अक्षयने स्वत: ला अलग केले आहे. आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पोस्ट करताना आज त्याने म्हटलं आहे की, “तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. मी ठीक आहे, परंतु खबरदारीच्या कारणास्तव मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. मी लवकरचं घरी येईल, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घ्या."