अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा Monochrome मधील बोल्ड आणि सुंदर अंदाज पाहून चाहते झाले खुश (See Photos)
काळा, पांढऱ्या मोनोक्रोम मधील भूमीचे हे फोटो पाहून तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत
अलीकडे बोल्ड आणि हॉट हे विशेषण जोडून अनेक अभिनेत्री या Exposing फोटो शेअर करत असतात, अर्थात ही अनेकांची आवड असूही शकते. मात्र या साऱ्यांमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव मात्र नेहमीच वावगे ठरते ती म्हणजे भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). आपल्या चित्रपटाप्रमाणेच सोशल मीडियावर फोटो पोस्टिंग मध्ये पण भूमीचा गेम स्ट्रॉंग आहे. याचा प्रत्यय तिच्या प्रत्येक पोस्ट मध्ये पाहायला मिळतो. अलीकडेच तिने Elle या मॅगझीन साठी एक फोटशूट केले, ज्यामध्ये तिचा बोल्ड पण तितकाच क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे. काळा, पांढऱ्या मोनोक्रोम मधील भूमीचे हे फोटो पाहून तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. Bhumi Pednekar चा बाथटबमधील हॉट फोटोने सोशल मिडियावर लागली आग; तिच्या मादक अदा पाहून चाहतेही झाले घायाळ
भूमीने या फोटोंमध्ये अगदी बेसिक शेडचे कपडे सुद्धा क्लासी लूक मध्ये दाखवले आहेत, यातील ब्लॅक कोट घातलेला भूमीचा फोटो हा सर्वांचे अधिक लक्ष वेधून घेत आहे. तर पांढऱ्या बेसिक टीशर्ट मध्ये सुद्धा तिच्या डोळ्यातून आणि एकूणच हावभावातून बोल्ड झलक पाहायला मिळत आहे. तुम्ही सुद्धा भूमीच्या या फोटोंची झलक पाहा..
भूमी पेडणेकर बोल्ड फोटो
हे फोटो Elle मॅगझीन साठी असून त्यात भूमीचे स्टायलिंग समर राजपूत यांनी केले आहे तर हे सुंदर फोटो बिक्रमजीत बोस यांनी टिपले आहेत.
भूमी पेडणेकर अलीकडेच वेदिका त्यागी या भूमिकेत पती पत्नी और वो मध्ये दिसून आली होती. २०२० मध्ये तिचा कोंकणा सेन शर्मा सोबत डॉली किट्टी और वो चमकते सितारे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तर त्यापाठोपाठ, तेलगू हॉरर भागमतीचा हिंदी रिमेक दुर्गावती मध्ये सुद्धा भूमी पेडणेकरचे कास्टिंग झाले आहे.