Bhool Bhulaiyaa 2: भूल-भुलैय्या 2 फर्स्ट लूक प्रदर्शित, अक्षयकुमारची भूमिका साकारणार अभिनेता कार्तिक आर्यन
या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार आहे. ज्यात सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'आमी जे तोमार' म्हणत अगदी लहानग्यांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच वेडं लावलेल्या मंजुलिकाचा 'भूलभुलैय्या' (Bhool Bhulaiyaa) हा चित्रपट लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकीच एक आहे. अक्षयकुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan) आणि शायनी अहुजा (Shiney Ahuja) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार आहे. ज्यात सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना न केवळ घाबरुन सोडवले असं हसून हसून लोटपोटही केले. त्याच्याच आता पार्ट दोन येत आहे. ज्यात कार्तिक आर्यन अक्षयकुमार ने पहिल्या पार्टमध्ये जी भूमिका साकारली होती त्या लूकमध्ये आता कार्तिक आर्यन दिसतोय. पाहूया फर्स्ट लूक
यात कार्तिकने पिवळ्या रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला आहे. त्याच्या हातात रुद्राक्षची माळ दिसत असून काळा चष्मा घातलेला दिसत आहे.
या पोस्टरमध्ये 31 जुलै ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या भुलभुलैय्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून पार्ट 2 च्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बाजमी करणार आहेत.
हेही वाचा- अभिनेता 'कार्तिक आर्यन'च्या नावाने लखनऊ पोस्ट ऑफिसने जारी केला पोस्टल स्टॅम्प
अभिनेता कार्तिकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, त्यच्याकडे 'भुलभुलैय्या 2' शिवाय 'पति पत्नी और वो' आणि 'दोस्ताना 2' आणि 'लव आजकल 2' मध्ये दिसणार आहे.