Bharti Singh Instagram Post: ड्रग्ज प्रकरणानंतर कॉमेडियन भारती सिंह हिने पती हर्ष लिंबाचियाचा उल्लेख करत केली 'ही' भावूक पोस्ट

मात्र या प्रकरणानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने आपला नवरा हर्ष लिंबाचियाचा उल्लेख करत एक भावूक पोस्ट केली आहे.

Bharti Singh And Harsh Limbachiya (Photo Credits: Instagram)

कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांचे ड्रग्ज प्रकरण अलीकडे चांगलेच गाजले. NCB ने भारतीच्या मुंबईस्थित घरात आणि कार्यालयात छापा टाकला. ज्यात त्यांना यावेळी एनसीबीला 86.5 ग्रॅम गांजा सापडला. यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने या दोन्ही कलाकारांविरोधात समन्स बजावून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने चौकशीदरम्यान, भारती आणि हर्ष सोबत एका ड्रग पेडलरलाही बसवले होते. त्यानंतर भारती आणि हर्षने ड्रग्ज घेतल्याची कबूली दिली. त्यानंतर त्यांची अटक आणि मग सुटका यामुळे हे दोघेही चर्चेत होते. त्यानंतर सोशल मिडियावर भारती फारशी सक्रिय दिसली नाही. मात्र या प्रकरणानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने आपला नवरा हर्ष लिंबाचियाचा उल्लेख करत एक भावूक पोस्ट केली आहे.

"अनेकदा आपण आपल्यातील उणीवा दाखवत नाही, पण आपले शक्ती, सामर्थ्य, आपली ताकद नक्की दाखवतो. माझी ही ताकद माझा चांगला मित्र, माझं प्रेम आहे हर्ष लिंबाचिया. लव्ह यू" असे आपल्या नव-याला उद्देशून ही भावूक पोस्ट केली आहे.हेदेखील वाचा-Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

21 नोव्हेंबरला सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती आणि हर्षच्या मुंबईच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर भारती आणि हर्षने गांजा घेतल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र 23 नोव्हेंबरला त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर भारतीला कल्याण तर हर्षला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान या दोघांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

यात या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून सपोर्ट देखील केला तर काहींनी टिका देखील केली. त्यामुळे भारतीने या पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत असेच म्हणावे लागेल.