'Being Haangryy' सलमान खान चा कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान गरजवंतांना अन्नधान्याची मदत करण्यासाठी नवा उपक्रम; मुंबई शहरात फिरणार फूड ट्रक

सध्या सलमान खान पनवेल मध्ये त्याच्या परिवारासोबत फार्म हाऊसमध्ये असला तरिही त्याने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा लेक, आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासोबत एक फूड ट्रक सुरू केला आहे.

सलमान खान (Image Credit: PTI/Twitter)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान रुपेरी पडद्यावर जितका धडाकेबाज तितकाच तो रिअल लाईफमध्ये सामान्यांसाठी, गोर गरिबांसाठी मदतीला धावून येतो याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे स्थिती बिकट झाली आहे. पण सलमान खान या कोरोना व्हायरस संकटातही अनेकांच्या मदतीला धावून गेला आहे. सध्या सलमान खान पनवेल मध्ये त्याच्या परिवारासोबत फार्म हाऊसमध्ये असला तरिही त्याने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा लेक, आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासोबत एक फूड ट्रक सुरू केला आहे. हा फूड ट्रक मुंबई शहरात फिरून गरजवंतांना अन्न देण्यासाठी मदत करणार आहे. Being Haangryy असं या फूड ट्रकचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान खानने लॉकडाऊनमुळे सिनेक्षेत्रात पडद्यामागे काम करणार्‍या रोजंदारीवरील काही कर्मचार्‍यांना आर्थिक मदत केली होती. त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये सलमान खानकडून विशिष्ट रक्कम दिली गेली. त्यानंतर पनवेलमध्येही काही दिवसांपूर्वी सिनेस्टार्ससोबत धान्याची, अन्नपदार्थाच्या मालाची सोय करताना सलमान खान दिसला होता. आता या लॉकडाऊनमध्ये सलमान खान फूड ट्रक ही नवी कल्पना घेऊन आला आहे. सलमान खान ने लॉकडाऊन उल्लंघन करणार्‍यांना फटकारले; तुम्ही इतके बहादुर आहेत की तुमच्या कुटुंबीयांना 'खांदा' देऊ शकाल?

सलमान खास लॉकडाऊन जेव्हा घोषित झाला तेव्हा पनवेलमध्ये फार्महाऊसवर होता. त्याने स्वतः इतर कलाकारांसोबत तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. सोबत व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून त्याने चाहत्यांनाही लॉकडाऊनमध्ये घरी रहा सुरक्षित रहा असं आवाहन केलं आहे.