IPL Auction 2025 Live

Nitu Chandra: 'माझी पत्नी हो, मी दर महिन्याला 25 लाख रुपये देईन' व्यावसायिकाने अभिनेत्रीला दिली होती ऑफर

मला हे समजत नाही की 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसह चित्रपट करूनही मला ना काम मिळत आहे ना पैसे."

Nitu Chandra (Photo Credit - Instagram)

"मला एका व्यावसायिकाने पगारदार पत्नी बनण्याची ऑफर दिली होती." याचा खुलासा बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नीतू चंद्रा (Nitu Chandra) हिने केला आहे. गरम मसाला, सिंघम 3 आणि ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री नीतू चंद्रा हिने एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक सत्य सांगितले. अभिनेत्री म्हणाली, "एका मोठ्या उद्योगपतीने मला 25 लाख रुपयांच्या पगारावर त्याची पत्नी बनण्याची (Salaried Wife) ऑफर दिली. मला हे समजत नाही की 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसह चित्रपट करूनही मला ना काम मिळत आहे ना पैसे." माध्यमांशी संवाद साधताना नीतू चंद्रा म्हणाली, "तुम्ही माझ्या कथेला 'यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी कथा' म्हणू शकता. कल्पना करा की मी 13 पुरस्कार विजेत्या अभिनेत्यांसोबत काम केले. मोठे चित्रपट केले. पण आज माझ्याकडे कोणतेही काम नाही. काळजी वाटत होती, इतके काम करूनही मला या इंडस्ट्रीत नकोसे वाटत आहे."

नीतू कास्टिंग काउचची झाली होती शिकार

नीतू पुढे म्हणते, 'मी देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. होय, एक कास्टिंग डायरेक्टर होता, मी नाव सांगणार नाही, तो खूप प्रसिद्ध आहे. तासाभराच्या ऑडिशननंतर तो म्हणाला, 'सॉरी नीतू, ये नहीं हो पायेगा'. याचा अर्थ तुम्ही मला नाकारण्यासाठी माझे ऑडिशन घेत आहात जेणेकरून माझा आत्मविश्वास तोडू शकेल. (हे देखील वाचा: Daler Mehndi Sentenced Jail: लोकप्रिय गायक दलेर मेहंदीला 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; मानवी तस्करी प्रकरणात झाली अटक)

 

View this post on Instagram

 

A post shared by Faridoon Shahryar (@ifaridoon)

कोण आहे नीतू चंद्रा?

नीतू चंद्राने 2005 मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या 'गरम मसाला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने 'ट्रॅफिक सिग्नल', '13बी', 'ओये लकी! लकी ओये!' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नीतू चंद्रा हिचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस 'चंपारण टॉकीज' देखील आहे, ज्या अंतर्गत तिने 'देसवा' आणि 'मिथिला माखन' सारखे दोन चित्रपट देखील तयार केले आहेत. लक्षात घेण्यासारखे आहे की नीतू चंद्राला तिच्या दोन चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनेत्रीने अलीकडेच 'नेव्हर बॅक डाउन: रिव्हॉल्ट' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले.