Saina Nehwal Biopic: बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक 'या' दिवशी होणार रिलीज; अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार साइनाच्या भूमिकेत

मात्र, आता हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Saina Nehwal, Parineeti Chopra (PC - Twitter)

Saina Nehwal Biopic: बॉलिवूडमध्ये खेळावर बनवलेल्या चित्रपटांना खूप पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांचा अशा चित्रपटाला नेहमीचं चांगला प्रतिसाद मिळतो. बर्‍याच दिवसांपासून देशातील स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या बायोपिकविषयी चर्चा सुरू होती. या चित्रपटाचे शुटिंग आता पूर्ण झाले असून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरचं हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, हा चित्रपट 100% ऑक्युपेंसीसह चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. वृत्तानुसार- सिनेमा हॉल पुन्हा एकदा 100 टक्के प्रेक्षकांसह सुरू होणार आहेत. त्यामुळे सायनाचा बायोपीक रिलीज करण्याची ही योग्य वेळ आहे. या चित्रपटाची कथा क्रीडा जगाशी संबंधित आहे. (वाचा - बनावट ई-मेल प्रकरणी Hrithik Roshan आपलं निवेदन देण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल; Kangana Ranaut संदर्भातील केसची होणार चौकशी)

दरम्यान, 26 मार्च आणि 9 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली आहे. भूषण कुमार एका वर्षात 20 चित्रपट घेऊन येणार आहेत, ज्याची सुरुवात मुंबई सागा चित्रपटापासून 19 मार्चला होणार आहे. यानंतर सायना चित्रपट प्रदर्शित होईल. तथापि, अद्याप जाहीर तारखेसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

या चित्रपटासाठी प्रथम अभिनेत्री श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आले होते. परंतु, नंतर तिच्या जागी परिणीती चोप्राचे नाव निवडले गेले. परिणीतीने या चित्रपटासाठी परिश्रम घेतले आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमोल गुप्ते यांनी केली आहे. चित्रपटात अभिनेता मानव कौल सायनाच्या प्रशिक्षक पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परेश रावलदेखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असतील. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.