Indian Idol 12 मध्ये सहभागी होणार 'बचपन का प्यार' फेम सहदेव; पवनदीप सह परफॉर्म करण्याची शक्यता- Reports
त्यामुळे हा शो अधिक खास करण्याची कोणतीही कसर निर्मात्यांनी सोडलेली नाही.
सोनी टीव्ही (SONY TV) वरील लोकप्रिय शो इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) हा शो आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे हा शो अधिक खास करण्याची कोणतीही कसर निर्मात्यांनी सोडलेली नाही. शो मध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असून एक्स इंडियन आयडल स्पर्धक देखील सहभागी होत आहेत. ग्रँड फिनालेची जोरदार तयारी होत असून सोशल मीडिया सन्सेशन सहदेव याला देखील शो मध्ये आमंत्रित करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. सहदेव केवळ शो मध्ये सहभागी होणार नाही तर पवनदीप सिंह सोबत परफॉर्म देखील करणार आहे.
या बातमीला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन सहदेव इंडियन आयडलमधून जावून आल्याचे मानले जात आहे. त्याचा तो एपिसोड विकेंडला प्रसारित होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सहदेव पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. (Indian Idol 11 Winner: सनी हिंदुस्तानी याने पटकावले 'इंडियन आयडल 11' चे विजेतेपद तर मराठमोळा रोहित राऊत ठरला रनरअप)
सहदेवचे 'बचपन का प्यार' गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यावर सामान्यांसह सेलिब्रिटी देखील व्हिडिओज बनवत आहेत. त्यामुळे सहदेवची शो मधील एन्ट्री चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. दरम्यान, बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहर देखील इंडियन आयडलच्या साईटवर दिसून येईल.