Babloo Bachelor Movie Poster: तेजश्री प्रधान बनणार बबलू बॅचलर ची नवरी; शर्मन जोशी सोबतच्या सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर करून फॅन्सना दिली खुशखबर
तेजश्रीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपला आगामी चित्रपट बबलू बॅचलर (Babloo Bachelor) चे पोस्टर शेअर केले असून या सिनेमात तेजश्री आणि अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) यांची केमिस्ट्री दिसून येणार आहे.
अग्गबाई सासूबाई(Aggabai Sasubai) या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात हिट ठरलेल्या तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही आता बॉलिवूड मध्ये पाहायला मिळणार आहे. तेजश्रीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपला आगामी चित्रपट बबलू बॅचलर (Babloo Bachelor) चे पोस्टर शेअर केले असून,आज या सिनेमाचा ट्रेलर देखील लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तेजश्री आणि अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) यांची केमिस्ट्री दिसून येणार आहे. याशिवाय पूजा चोपडा (Pooja Chopra) आणि राजेश शर्मा (Rajesh Sharma) हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. तेजश्री ने शेअर केलेल्या पोस्टर मध्ये नवरदेवाच्या पेहरावात असणारा शर्मन जोशी आणि त्याच्या दोन्ही बाजूला पूजा आणि तेजश्री या नवरीच्या लेहेंग्यात दिसून येत आहेत. Baaghi 3 Official Trailer: धमाकेदार Action Scene सह अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बागी 3 चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
बबलू नामक एका तरुणाचे लग्न एका सुंदर मुलीशी होते मात्र मधुचंद्राच्यारात्रीच त्याची बायको पळून जाते आणि मग पुढे घडणारी कथा या सिनेमात मंडळी जाईल असे सध्या म्हंटले जातेय. तर चित्रपटाच्या पोस्टर वरून तरी दोन बायकांच्या मधोमध अडकलेल्या नवरदेवाची कथा सांगितली जाईल असा अंदाज येत आहे, लव्ह ट्रँगलचे कथानक असणारे अनेक सिनेमे आजवर आपण बॉलिवूड मध्ये पहिले आहेत, मात्र हा सिनेमा त्यापासून कसा वेगळा असणार हे जाणून घेण्यासाठी आता ट्रेलर प्रदर्शित होईपर्यतची वाट पाहावी लागणार आहे.
तेजश्री प्रधान पोस्ट
तेजश्रीचा हा नवा कोरा सिनेमा २० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय राजवानी यांनी चित्रपटाची निर्मित केली असून अग्निदेव चॅटर्जी यांनी दिग्दर्शन केले आहे. सध्या झी मराठीवर तेजश्रीची मालिका अग्गबाई सासूबाई तुफान हिट ठरली आहे, यापूर्वी मराठी सिनेमा आणि नाटकातून काम करत तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती, आता पहिल्यन्दाच बॉलिवूडच्या पडद्यावर ती काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.