Baaghi 3 Official Trailer: धमाकेदार Action Scene सह अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बागी 3 चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
चित्रपट 'बागी' आणि 'बागी 2' चित्रपटातून धमाकेदार अॅक्शन सिन करत झळकलेला अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) 'बागी 3' या मध्ये पुन्हा दिसणार आहे.
Baaghi 3 Trailer: चित्रपट 'बागी' आणि 'बागी 2' चित्रपटातून धमाकेदार अॅक्शन सिन करत झळकलेला अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) 'बागी 3' या मध्ये पुन्हा दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. टायगर श्रॉफसह यामध्ये श्रद्धा कपूर, रितेश देखमुख आणि अंकिता लोखंडे सुद्धा मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर टायगर श्रॉफ याने ट्वीटकरत शेअर केला आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर ही टायगर श्रॉफ याच्या गर्लफ्रेन्डची भुमिका साकारणार आहे. तर अंकिता लोखंडे ही रितेश देशमुख याच्या प्रेयसीच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा अॅक्शन सिनने भरलेली असून टायगर याचा चाहत्यांना त्याचा बागी 3 नक्की आवडेल याची अपेक्षा केली जात आहे.
ट्रेलर शेअर करत टायगर याने असे लिहिले आहे की, बागी आता पुन्हा परत आला आहे. यावेळी सर्वात महान युद्ध लढण्यासाठी तयार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये टायगर आणि विक्रम या दोघांमधील जीवाभावाचे नाते दाखवण्यात आले आहे. लहानपणापासून जेव्हा कधी रोनी (टायगर) कठीण परिस्थितीत मदत करतो. कथेनुसार, विक्रम (रितेश) कोणत्यातरी कामासाठी विदेशात गेल्याने रस्त्यामधील काही लोक त्याचे अपहरण करतात. मात्र त्याच क्षणाला रोनी त्याच्या भावाला वाचवण्यासाठी पुढे सरसावताना दिसून येत आहे.(War Teaser: अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा जबरदस्त अॅक्शन सीन्स असलेला 'वॉर' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित)
अंकिता लोखंडे ही श्रद्धा कपूर हिच्या मैत्रिणीची भुमिका साकारणार आहे. अहमद खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 6 मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'बागी 3' व्यतिरिक्त रितेश 'हाउसफुल 4' मध्ये दिसेल. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मरजावां' चित्रपटातही तो काम करणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल. रितेश आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एकत्रित काम केलेला 6 वा चित्रपट आहे.