Atul Kulkarni Visits Kashmir: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचे कश्मीरमधून अवाहन; 'येथील नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन, पाठिंबा द्या'

Atul Kulkarni (Photo/instagram/@atulkulkarni_official)

Atul Kulkarni Kashmir Visit: पहलगाममधील दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी कश्मीरला भेट दिली. तेथे त्यांनी एकता आणि समतेच्या भावनेतून सर्वांना एकत्र येण्याचे आणि येथील स्थानिक नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन (Actor Supports Kashmir) देण्याचे अवाहन देशातील नागरिकांना केले. अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, मुंबई ते श्रीनगर या प्रवासाची माहिती रविवारी (27 एप्रिल) सामायिक केली. ज्यामध्ये रिकाम्या फ्लाइट सीट्सचे फोटो, त्यांचा बोर्डिंग पास आणि फ्लाइट क्रूने दिलेली एक हृदयस्पर्शी चिठ्ठी यांचा समावेश आहे.

अभिनेत्याने छायाचित्रांतून दाखवली विद्यमान स्थिती

अतूल कुलकर्णी यांनी यांनी पहलगाम येथील एक छायाचित्र देखील पोस्ट केले, ज्यामध्ये एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेले असामान्यपणे निर्जन भूदृश्य दर्शविले गेले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी काश्मीरचे शांत सौंदर्य - स्वच्छ निळे आकाश, वाहणारे नाले आणि हिरवेगार दऱ्या दर्शविणारे मनमोहक छायाचित्रेही सामायिक केली. स्थानिक काश्मिरींनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात धरले होते आणि अभिमानाने भारतीय ध्वज फडकवला होता, हा क्षण कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ठळकपणे अधोरेखित केला. (हेही वाचा, Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास)

पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी, पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानंतर अभिनेत्याची ही भेट अधिक चर्चेत आली आहे, ज्यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सन 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला असल्याचे वर्णन केले जात आहे, ज्यामध्ये 40 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. पर्यटकांमध्ये आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि आव्हानात्मक काळात काश्मीरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी कुलकर्णी यांचे आवाहन एक महत्त्वाचे आवाहन म्हणून पाहिले जात आहे. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई; संशयित दहशतवाद्यांच्या घरावर बुलडोजर)

अतूल कुलकर्णी यांच्याकडून इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून अवाहन

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Atul Kulkarni (@atulkulkarni_official)

दरम्यान, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बायसारन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जखमी झाले. हा हल्ला "द रेसिस्टन्स फ्रंट" (TRF) या पाकिस्तान-आधारित लष्कर-ए-तोयबाच्या गटाने केला असल्याचे सांगितले गेले, परंतु नंतर त्यांनी जबाबदारी नाकारली. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव तीव्र झाला, ज्यामुळे भारताने सिंधू जल करार निलंबित केला आणि पाकिस्तानमधील काही राजनैतिक अधिकारी परत बोलावले. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा आणि शांततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement